Tuesday, December 5, 2023

अहमदनगर शिक्षकाचा अपघाती मृत्यू; दीड कोटींची भरपाई…न्यायाधिकरणाचे आदेश

अहमदनगर -शिक्षकाच्या अपघाती मृत्यूबद्दल वारसांना 1 कोटी 44 लाख रुपयांची भरपाई अहमदनगर येथील मोटार अपघात न्यायाधिकरणाचे न्यायाधीश सुनील गोसावी यांनी मंजूर केली आहे. अ‍ॅड. विष्णूदास भोर्डे यांनी अर्जदारातर्फे काम पाहिले.

अहमदनगर शहरातील बोल्हेगाव उपनगरातील राघवेंद्र स्वामी विद्यानिकेतनचे शिक्षक वामन दत्तात्रय भुकन (रा. आल्हानवाडी, ता. पाथर्डी) हे 18 मार्च 2018 रोजी धान्याच्या पोत्यासह टेम्पो (एमएच 16 एव्ही 307) मधून अहमदनगरकडे येत होते. अहमदनगर- पाथर्डी रस्त्यावर कौडगाव (ता. नगर) शिवारात आले असता, ट्रक (एमएच 16 बी 3246) समोरील बाजूने जोराची धडक दिली. या अपघातामध्ये शिक्षक वामन भुकन हे ठार झाले तर टेम्पो चालक पोपट मदने हा गंभीर जखमी झाला. मदगे यांच्या डाव्या पायास मोठी दुखापत झाल्याने हा पाय कापून टाकावा लागला होता.

शिक्षक भुकन यांच्या वारसदारांनी नुकसान भरपाईसाठी मोटार अपघात न्यायाधिकरणाकडे अर्ज दाखल केला होता. न्यायाधिकरणाने 99 लाख 68 हजार रुपये भरपाई मंजूर केली. अर्ज दाखल केल्यापासून भरपाई रक्कमेवर 8 टक्के दराने व्याज देण्याचा आदेश न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि ट्रक मालक यांना संयुक्तपणे दिला आहे. भुकन यांच्या वारसांना 1 कोटी 44 लाख रुपये भरपाई मंजूर झाली आहे. चालक मदगे यांना अपघातामध्ये डावा पाय गमवावा लागल्याने 20 लाख 26 हजार रुपये भरपाई मंजूर केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: