Tuesday, April 23, 2024

अहमदनगर शहरातील बांधकाम व्यावसायिक अजय आकडे यांचे अपघाती निधन

अहमदनगर शहरातील बांधकाम व्यावसायिक अजय आकडे यांचे अपघातात निधन
अहमदनगर : येथील प्रतिथयश उद्योजक व बांधकाम व्यावसायिक इंजिनिअर अजय चंद्रकांत आकडे यांचे काल रात्री प्रेमदान चौकात अपघाती निधन झ्ााले. भरधाव वेगातील एका स्पॉर्पिओ वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झ्ााल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. अजय आकडे यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत मनमिळावू असल्याने त्यांना नगरमध्ये मोठा मित्रपरिवार आहे. त्यांच्या अकाली जाण्यामुळे अनेकांना धक्का बसला असून, हळहळ व्यक्त होत आहे. आकडे हे निवृत्त उपजिल्हाधिकारी चंद्रकांत आकडे यांचे चिरंजीव होत. आकडे यांच्यामागे वडील चंद्रकांत आकडे, भाऊ पोलिस उपाधीक्षक अनिल आकडे, पत्नी सोनल व मुलगी डॉ. गृषा असा परिवार आहे.

Related Articles

1 COMMENT

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles