Thursday, July 25, 2024

न्यायालयाच्या आदेशानुसार नगर महानगरपालिका कर्मचारी वारसांना तातडीने नोकरीवर सामावून घेण्यात यावे

अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी युनियनच्या वतीने प्रभारी आयुक्त सौरभ जोशी यांचा सत्कार संपन्न.

मा. न्यायालयाच्या आदेशानुसार वारसांना तातडीने नोकरीवर सामावून घेण्यात यावेत – बाबासाहेब मुदगल

नगर – अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्त पदी सौरभ जोशी यांची राज्य शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आल्याबद्दल अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी युनियनच्या वतीने सत्कार करून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली असता मा. उच्च न्यायालय यांनी लाड-पागे समितीच्या शिफारशींच्या वारस नोकरींसाठी वारसाह‌काने नोकरी भरती करण्याच्या कामी स्थगिती आदेश दिलेला होता, या आदेशामध्ये दुरुस्ती करून मा. न्यायालय यांनी दि. १०/०४/२०२३ रोजी मेहेतर, वाल्मिकी आणि भंणी समाजातील सफाई काम करणान्या कामगारांना वारस नोकरी देणेयायत आदेश दिले होते. त्या आदेशामध्ये मा. उच्च न्यायालय यांनी दि. २४/०५/२०२४ रोजी आदेश निर्गमित केलेले आहेत. या आदेशामध्ये मा. न्यायालय यांनी शेड्युल्ड कास्ट (अनु. जाती) व नवबौद्ध या प्रवर्गातील वारस नोकरी देणेबाबत आदेश दिलेले आहेत. तसेच दि. १०/०४/२०२३ च्या आदेशाप्रमाणे जर या कर्मचान्यांचे वारसांचे वव विहीत वयोमर्यादचे पुढे गेले असल्यास त्यांना सामावून घेणेचायतचे आदेश देण्यात आलेले आहेत. तरी अहमदनगर महानगरपालिकेने लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार व मा. न्यायालयाच्या आदेशानुसार वारसांना तातडीने नोकरीवर सामावून घेण्यात यावेत अशी मागणी यावेळी कर्मचारी युनियनच्या वतीने प्रभारी आयुक्त सौरभ जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी युनियन चे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल,जितेंद्र सारसर, सचिव आनंदराव वायकर,नंदकुमार नेमाने,राहुल साबळे,महादेव कोतकर,दिपक मोहिते,बाबासाहेब राशिनकर,विजय कोतकर,प्रफुल लोंढे,बाळासाहेब व्यापारी,अमोल लहारे,सागर साळुके,अकिल सय्यद,अनंत लोखंडे आदींसह उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles