Saturday, May 25, 2024

पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून ठार मारल्या प्रकरणी आरोपीला जन्मठेप, नगर जिल्ह्यातील घटना..

श्रीगोंदा : कुन्हाडीने वार करून पत्नीस जिवे मारल्याप्रकरणी पिंपळगाव पिसा(ता. श्रीगोंदा) येथील रोहिदास भिकाजी पंधरकर याला श्रीगोंदा येथील जिल्हा
सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी जन्मपेठेची शिक्षा सुनावली आहे.रोहिदास पंधरकर याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी पत्नीस मारहाण करीत असे. २९ एप्रिल २०२२ रोजी आरोपी दारू पिऊन घरी आला.त्यावेळी त्याने पत्नी व मुलासोबत भांडणे केले.

पहाटे साडेचारच्या सुमारास मुलांना ओरडण्याचा आवाज
आला. त्यामुळे त्यांची मुले रूममधून हॉलमध्ये आली. त्यांना रोहिदास हा पत्नीस कुम्हाडीने वार करीत असल्याचे दिसले. मुलांना पाहून त्याने हातातील
कुन्हाड बाथरूमजवळ टाकून तो घरातून निघून गेला. याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी न्यायाधीश मुजीब एस. शेख यांच्या समोर झाली.

या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी
वकील पुष्पा कापसे/गायके यांनी काम पाहिले. न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व सरकारी वकील पुष्पा कापसे/गायके यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून
न्यायालयाने आरोपींना वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी सुजाता जयवंत गायकवाड यांनी सहकार्य केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles