Saturday, July 12, 2025

अहमदनगर कोपरगाव सबजेल मधील बहुचर्चित हत्याकांडातील आरोपी पसार

बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांडातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन झाला पसार

शिर्डी (प्रतिनिधी):- राज्यात गाजलेले शिर्डीतील सागर शेजवळ हत्याकांडातील आरोपी कोपरगाव येथील कारागृहातून रुग्णालयात उपचारासाठी नेत असतांना पोलीसांना चकवा देऊन फरार झाल्याची घटना रविवारी दि.२ जुन मध्यरात्रीच्या सुमारास तहसिल कार्यालयाच्या आसपास घडली असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील कारागृह येथे अटक असलेला सागर शेजवळ खून प्रकरणातील आरोपी योगेश सर्जेराव पारधे याला शनिवारी रात्रीच्या सुमारास रक्ताची उलटी होत असल्याने त्याला तपासणीसाठी पोकॉ/ढाकणे यांनी दुचाकीवरून ग्रामीण रूग्णालयात नेत असताना गाडी वळणावर गती कमी झाल्याचा फायदा घेऊन दुचाकीवरून उडी मारत पोलिसाला चकवा देत आरोपी पसार झाला. यावेळी पोलीस कर्मचारी ढाकणे यांनी अतोनात प्रयत्न केले परंतु अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला. ढाकणे यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशन गाठून सदर घटनेची माहिती दिली.पोकॉ/ढाकणे यांच्या फिर्यादीवरून वरून आरोपी योगेश पारधे याच्या विरुद्ध गुरनं/260/24 भादंविक 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची माहिती मिळताच शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी आरोपीच्या शोधासाठी तपासाची चक्री फिरवली असून त्याच्या तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles