अहमदनगर जिल्ह्यातील मंदीर चोरीतील सराईत आरोपी 7,19,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरकडुन जेरबंद 22 गुन्हे उघड.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी श्री. तुषार विजय वैद्य वय 36, धंदा- पुजारी, रा. पाथर्डी हल्ली रा. रेणुकामाता मंदीर अमरापुर, ता. शेवगांव हे पुजारी असलेल्या रेणुकामाता मंदीराचे अनोळखी आरोपींनी दरवाजाचे कुलूप तोडुन देवीचे अंगावरील 16,76,400/- रुपये किंमतीचे विविध प्रकारचे सोन्य चांदीचे दागिने चोरुन नेले होते. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी शेवगांव गु.र.नं. 809/23 भादविक 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मंदीर चोरीची घटना संवेदनशिल असल्याने मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना स्थागुशाचे विशेष पथके नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात, पोसई/ तुषार धाकराव, पोसई/सोपान गोरे, सफौ/भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ/दत्तात्रय हिंगडे, मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, सुरेश माळी, अतुल लोटके, पोना/रविंद्र कर्डीले, संदीप दरंदले, संतोष लोढे, सचिन अडबल, विजय ठोंबरे, भिमराज खर्से, संदीप चव्हाण, संतोष खैरे, गणेश भिंगारदे, पोकॉ/ मच्छिंद्र बर्डे, आकाश काळे, रणजित जाधव, रोहित मिसाळ, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, मपोना/भाग्यश्री भिटे, चापोहेकॉ/संभाजी कोतकर, उमाकांत गावडे, भरत बुधवंत व अरुण मोरे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन पथके नेमुन आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथके शेवगांव, पाथर्डी परिसरात फिरुन रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेताना पोनि/दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, अमरापुर, ता. शेवगांव येथील रेणुकामाता मंदीरातील चोरी ही इसम नामे गणपत केदार रा. हातराळ सैदापुर, ता. पाथर्डी याने त्याचे इतर साथीदारासह केली असुन चोरी केलेले मंदीरातील सोन्या चांदीचे दागिने व आभुषण शेतात पुरुन ठेवलेले आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन, पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत मार्गदर्शन केले.
पथकाने लागलीच हातराळ सैदापुर, ता. पाथर्डी येथे जावुन संशयीत नामे गणपत केदार यांचे ठावठिकाणा बाबत माहिती घेवुन तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) गणपत कुंडलिक केदार वय 46, रा. हातराळ, सैदापुर, ता. पाथर्डी असे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता सुरुवातीस तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी करता त्याने त्याचे साथीदार नामे अजय छबु चव्हाण, जॅकसन ऊर्फ किशोर पुंजाराम जाधव दोन्ही रा. माळीबाभुळगांव, ता. पाथर्डी व दोन विधीसंघर्षीत बालक यांना सोबत घेवुन गुन्हा केल्याची कबुली देवुन शेतात पुरलेले मंदीरातील चोरी केलेले सोन्या चांदीचे आभुषण काढुन दिल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले.
आरोपीचे इतर साथीदारांचा शोध घेता ते मिळुन आल्याने त्यांना विविध ठिकणाहुन ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 2) अजय छबु चव्हाण वय 27, 3) जॅकसन ऊर्फ किशोर पुंजाराम जाधव वय 34, दोन्ही रा. माळीबाभुळगांव, ता. पाथर्डी व दोन विधीसंघर्षीत बालक असे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींना आणखीन कोठे कोठे गुन्हे केले या बाबत विचारपुस करता त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात गुन्हे केल्याची कबुली दिल्याने गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे एकुण -22 गुन्हे उघडकिस आले आहेत.