मोटार सायकल चोरी करणारा आरोपी मुद्देमालासह कोतवाली पोलीसांकडुन जेरबंद
दि.०९/११/२४ रोजी फिर्यादी नामे-गौतम रघुनाथ आरगडे वय -१९ वर्षे रा.सौदाळा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर हल्ली मुक्काम डाळमंडई यांनी फिर्याद दिली की, ते इंजीनियरींगचे शि क्षण घेत असुन कॉलेज ला येणेजाणेसाठी वापरत असलेली हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटार सायकल ही मध्य रात्री १२.०० वा चे सुमारास पार्किंग मधुन चोरुन नेली आहे वगैरे मजकुरच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोस्टे गुन्हा रजि नं. ११९४/२०२४ बी.एन.एस २०२३ चे कलम ३०५ (ब) प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असतांना कोतवाली गुन्हे शोध पथकाने सदर घटनेचे तांत्रिक विश्लेषन करुन सदरची मोटारसायकल ही कोठला झोपडपटटी, अहिल्यानगर येथील आरोपी नामे-मोहसिन मुसा शेख यानेच नेलेबाबत खात्री झाल्याने सदर आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेवुन त्याचेकडे सदर चोरीचे मोटारसायकल बाबत विचारपुस करता त्याने प्रथम उडवाउडविची उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असुन त्याचे कडुन चोरीची मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे. तरी सदर गुन्हयाचा पुढील तपास मपोना/वंदना काळे हया करीत आहेत.
सदरची कारवाई ही त्या वेळी मा. पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला सोो, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती सो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे साो सपोनि योगीता कोकाटे, पोहेकाँ योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, सलिम शेख, विक्रम वाघमारे, शरद वाघ, मपोना वंदना काळे, पोकाँ अभय कदम, अमोल गाढे, सतिष शिंदे, अतुल काजळे, यांनी केली आहे.