जिल्हा परिषद पाणी पुरवठा अहमदनगर विभागाचे कार्यालयात तोडफोड करणारा आरोपी कोतवाली पोलीसांनी काही तासात केला जेरबंद
दिनांक १८/१/२०२४ रोजी दुपारी ३/०० वाजण्याचे सुमारास जिल्हा परिषद अहमदनगर येथे ग्रामिण पाणीपुरवठा ऑफिसचे कार्यालयीन कामकाज सुरु असतांना जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष प्रकाश पोटे रा. निंबोडी ता. नगर जिल्हा अहमदनगर यांने जल जिवन मिशन अंतर्गत मौजे कोल्हेवाडी ता. नगर व हातवळन (देवीचे) येथील जिल्हा परिषद पाणिपुरवठा विभागाने केलेले काम हे निष्कृष्ठ आहे या कारणावरुन जिल्हा परिषद अहमदनगर येथे ग्रामिण पाणीपुरवठा ऑफिसमध्ये प्रवेश करुन मोठमोठ्या आरडा ओरडा व शिविगाळ करुन त्याचे हातातील लाकडी दांडक्याने ऑफिस मधील सामानाची तोडफोड करुन नुकसान करुन तेथुन निघुन गेला होता,
त्याचा शोध घेणे करीता कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तात्काळ तपासाचे चक्रे फिरवून सदर आरोपीचा शोध घेणे करीता पथके तयार करुन रवाना केले सदर शोध पथकातील पोलीस अंमलदारांनी त्याचा शोध घेवुन त्यास काही तासातच ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सो। अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे व उपविभाग पोलीस अधिकारी श्री हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे पथकातील पोहेकॉ. तन्वीर शेख, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, अविनाश वाकचौरे, सोमनाथ राऊत, संदिप थोरात, अभय कदम व मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांनी केलेली असुन कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांनी असे आव्हान केले आहे की, सरकारी तसेच कुठल्याही खाजगी कार्यालयाची तोडफोड केल्यास कोणाची गय केली जाणार नाही. सदर गुन्ह्याचा तपास सपोनी/ भांन्सी कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहेत.