Monday, April 22, 2024

विवाह समारंभात प्रचार केल्यास कारवाई….आयोगाची टिम ठेवणार वॉच

अहमदनगर-लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे नगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघांत होणाऱ्या विवाह सोहळ्यांत उमेदवारांचा प्रचार होऊ नये, यासाठी स्थायी निगराणी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ७२ ही पथके आहे. यात पाच जणांचे हे पथक विवाह सोहळ्यांवर विशेष लक्ष ठेवून असणार आहे. या पथकांमध्ये एका अधिकाऱ्यांसह तीन पोलिस व एक छायाचित्रण करणाऱ्यांचा समावेश असणार आहे

हे पथक लग्न सोहळ्यांत ऐनवेळी येऊन चित्रीकरणही करणार आहे. लग्न कार्यात प्रचार करताना आढळल्यास आचारसंहिता भंगाची संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.आचारसंहितेच्या या निर्बंधांमुळे लोकसभा निवडणुकीच्या पर्वणीत वधू-वरांच्या लग्नाचे रंग फिके पडू शकतात.
नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता 5 लागू करण्यात आली आहे. ३ एप्रिलपासून विवाह सोहळ्यांना प्रारंभ होत आहे. एप्रिल ते मे दरम्यान होणाऱ्या विवाह सोहळ्यांतील उमेदवारांच्या प्रचारावरही आचारसंहितेची बंधने आली आहेत.

आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी विवाह सोहळ्यांवर स्थायी निगराणी पथकाचे विशेष लक्ष असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे नगर जिल्ह्यात तपासणी नाके, तसेच अन्य ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी ७२ पथकांची नियुक्ती करणान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केला.आली आहे. २४ तास हे पथके हालचालींवर लक्ष ठेवणार आहे. दिवसा ३६ पथके तर रात्री ३६ पथके कार्यरत करण्यात आली आहेत.यात स्थायी निगराणी पथकाचा समावेश आहे. या पथकात अव्वल कारकून दर्जाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तीन पोलिस व एक चित्रीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे पाच जणांचे पथक आता विवाह सोहळ्यांवर देखील विशेष लक्ष ठेवणार आहे. पथक ऐनवेळी विवाह सोहळ्यात जाऊन तेथे चित्रीकरण करून आचारसंहितेचा भंग होत आहे की नाही ? याची खातरजमा करणार आहे.

आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे आचारसंहितेच्या कालावधीत उमेदवारांचा प्रचार करताना आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे पाच जणांचे स्थायी निगराणी पथक हे विवाह सोहळ्यात जाऊन चित्रीकरण देखील करणार आहेत -प्रशांत गोसावी नायब तहसीलदार निवडणूक शाखा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles