Monday, April 28, 2025

अहमदनगरमध्ये विनाक्रमांक, फॅन्सी नंबर प्लेट वाहनावर लावताय, पोलिसांच्या कारवाईची चर्चा…

नगर ः
विनाक्रमांक किंवा फॅन्सी क्रमांक लावून वाहन फिरणाऱ्यांवर कोतवाली पोलिसांची ‘अॅक्शन’, ‘रिअॅक्शन’ आणि ‘सोल्यूशन’, अशी त्रिसूत्री कारवाई सुरू केली आहे. कोतवाली पोलिसांनी अशी केलेली कारवाई राज्यात पहिल्यांदा झाली. उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या या कारवाईची सध्या नगर जिल्ह्याबरोबर राज्य पोलीस दलात चर्चा आहे.

नगर शहरात दुचाकीवरून येत लुटीच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. गुन्हेगारांची शोध घेण्यासाठी वाहनांवरील क्रमांक महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे गुन्हा घडला की पहिले वाहन आणि त्यानंतर त्याचा क्रमांक पोलिसांकडून तपासला जातो. परंतु अलीकडच्या काळात नगर शहरात विनाक्रमांक दुचाकी, फॅन्सी नंबर प्लेटच्या दुचाकींची संख्या वाढली आहे. याशिवाय गुन्हेगारी देखील वाढली आहे. पोलिसांकडून उपाययोजना होतात. परंतु ठोस असे काही साध्य होत नाही. मात्र उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी शहरातील विनाक्रमांक, फॅन्सी नंबर प्लेटवर ‘अॅक्शन’, ‘रिअॅक्शन’ आणि ‘सोल्यूशन’, अशी त्रिसूत्री कारवाई सुरू केली आहे.

कारवाईतील ही त्रिसूची म्हणजे, विनाक्रमांक आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर ‘अॅक्शन’ घेत कारवाई करायची. ती वाहने ताब्यात घेऊन थेट पोलीस ठाण्यात आणायची. या कारवाईनंतर ‘रिअॅक्शन’ म्हणजेच, विनाक्रमांक किंवा फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनाची कागदपत्रे तपासत दंडात्मक कारवाई करायची. यानंतर पुढचा भाग महत्त्वाचा ठरतो. पूर्वी पोलीस दंडात्मक कारवाई करून वाहन सोडून दिले जायचे. परंतु पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या या त्रिसूत्री कारवाईतील ‘अॅक्शन’, ‘रिअॅक्शन’नंतरचा पुढचा टप्पा महत्त्वाचा ठरतो, तो म्हणजे ‘सोल्यूशन’!

दंडात्मक कारवाईनंतर या वाहनांवर कोतवाली पोलिसांनी सरकारच्या नियमाप्रमाणे नंबर प्लेट बसवून दिली गेली. कोतवाली पोलिसांनी आज पहिल्या दिवशी अशा 42 वाहनांवर कारवाई केली. विनाक्रमांक आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई, दंड आणि नियमानुसार वाहनाच्या पुढे आणि मागे नंबर प्लेट बसवून दिली आहे. या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नऊ पथके तयार केली होती. या पथकांनी कारवाई करत वाहन पोलीस ठाण्यात घेऊन यायचे. पोलीस ठाण्यात पथक वाहनांची कागदपत्रे तपासणार आणि त्यावर लगेचच पुढची कारवाई होणार, अशी ही कार्यपद्धती होती. आज या कारवाईत वाहनचालकांना १९,५०० रू दंड आकारण्यात आला आणि विशेष म्हणजे कोतवाली पोलिसांनी सर्व वाहन चालकांना चहाची व्यवस्था केली होती.

विनाक्रमांक आणि फॅन्सी नंबर प्लेट वाहनांवर बसून येत लुटीचे प्रकार वाढले आहेत. ते रोखण्यासाठी नगर शहरात ही त्रिसूत्री कारवाईची मोहीम राबवण्यात आली. आज 42 वाहनांवर कारवाई झाली असून, या वाहन चालकांनी नंबर प्लेटमध्ये छेडछाड केल्यास पुढे फौजदारी कारवाई करू.
– चंद्रशेखर यादव
पोलीस निरीक्षक, कोतवाली पोलीस ठाणे

नंबर प्लेटच्या छेडछाडीचे कारणे…
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी राबवलेल्या या मोहिमेत काहींनी शायनिंग, तर काहींनी फायनान्स कंपनी वाहने जप्त करूतन नेतील म्हणून क्रमांक बदलले होते. याशिवाय सहजासहजी गुन्हा करता यावा यासाठी फॅन्सी नंबर प्लेट करून घेतल्या होत्या. मात्र कोतवाली पोलिसांच्या या मोहिमेतील त्रिसूत्रीने विनाक्रमांक आणि फॅन्सी नंबर प्लेट वाहनधारकांची धाबे दणाणले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक’ प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सपोनी विश्वास भानसी उपनिरीक्षक प्रवीण पाटील शितल मुगडे सुखदेव दुर्गे साहेब पोलीस जवान दिपक साबळे तनवीर शेख अभय कदम श्रीकांत खताडे जयश्री सुद्रिक सोनाली भागवत संतोष बनकर गणेश धोत्रे गणेश ढोबळे सलीम शेख इस्राईल पठाण सोमनाथ केकान नकुल टिपरे विशाल कुलकर्नी राम हंडाळ पल्लवी रोहकले सोनाली खर्माळे रोहिणी मंडलिक पूजा दिक्कत कविता गडाख कल्पना आरावडे आदींनी केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles