Monday, March 4, 2024

नगरमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई होणार, मनपा प्रशासक डॉ.पंकज जावळे अँक्शन मोडवर

अहमदनगर : शासनाने वापरास प्रतिबंध केलेल्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर महानगरपालिका कठोर कारवाई करणार असून अशा विक्रेत्यांची गोपनीय माहिती देणारास महापालिका प्रशासनाकडून पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी
या विषयाबाबत आयोजीत बैठकीत दिली.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त अजित निकत, सहा. आयुक्त सपना वसावा, स्वच्छता कक्ष प्रमुख परीक्षीत बिडकर, प्रसिद्धी विभाग प्रमुख नजान , हरियालीचे सुरेश खामकर, हरिभूमीचे अभय ललवाणी यांसह स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.
नायलॉन मांजामुळे मनुष्य तसेच पक्षांच्या जीवित धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या नायलॉन मांजावर शासनाने प्रतिबंध घातलेले आहेत. त्या अनुषंगाने महापालिकेत बैठक आयोजित करण्यात आली होती. महानगरपालिका मध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची माहिती ७५८८१६८६७२ या भ्रमणध्वनीवर द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. याचबरोबर नागरिकांनी देखील जीविकास धोका निर्माण करणाऱ्या नॉयलॉन मांजाचा वापर स्वतःहून टाळावा असे आवाहन प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles