Monday, June 23, 2025

Onion News: कांद्याचे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार

कांदा उत्पादक शेतकऱ्यानंतर आता कांदा व्यापारी वर्गाने बेमुदत संपाची हाक दिली आहे. प्रलंबित मागण्यासंदर्भात तोडगा निघू शकला नसल्यानं आजपासून कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे. दरम्यान, लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आदेश पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. सणासुदीच्या काळात लिलाव बंद ठेवणे योग्य नाही. त्यामुळं पणन आयुक्त आणि नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना सत्तारांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
कांदा व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघू न शकल्यामुळे आजपासून कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच कांद्याचे निर्यातमूल्य वाढवल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदची हाक दिली असून नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 बाजार समिती व उपबाजार समितीत कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीही कांदा विक्रीस न आणल्याने बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क साधला. यावेळी सत्तारांनी लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles