Tuesday, February 18, 2025

शरद पवार अजित पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले; सहकार मंत्र्यासमोरच घातला राडा!

पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांत भिडल्याने एकच राडा झाला. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर हा सगळा राडा झाला. आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्व साधारण सभेत दोन तास गदारोळ सुरू होता.

अजित पवार गटाचे मंत्री वळसे पाटील यांच्या विरोधात विधानसभा लढण्यास इच्छुक असणारे शरद पवार गटाचे देवदत्त निकम या दोघांचे हे समर्थक होते. “आम्हाला बसू दिले नाही, मंचावर येऊ दिले नाही, बैठकीत वळसे पाटलांनी स्वतःचा प्रचार केला, हे सगळे घडवून आणण्यासाठी ते गुंड घेऊन आले”, असा आरोप देवदत्त निकम यांनी केला. याच मुद्द्यावरुन दोन्ही गटात तुफान राडा झाला. दरम्यान मंत्री वळसे पाटलांनी शांततेचं आवाहन केले. मात्र सभेत वेगवेगळ्या कारणांवरून राडा सुरूच राहिला.

शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करत देवदत्त निकम यांना बाहेर जाण्याची विनंती करण्यात आली. यानंतर देवदत्त निकम यांनी आम्हाला सभेतून हकलण्यासाठी गुंड आणल्याचा आरोप केला. मात्र हे सगळे आरोप अजित पवार गटाने फेटाळले. विनाकारण राजकीय रंग देऊन स्वतःची पोळी भाजण्याचे प्रयत्न निकामांनी केल्याचा पलटवार करण्यात आला. देशातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या भीमाशंकर कारखान्याच्या वार्षिक बैठकीत हा गदारोळ करून काय साध्य केलं. उलट कारखाना बदनाम करण्याचे प्रयत्न केले. असा पलटवार अजित पवार गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles