छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’. या मालिकेतील यश-नेहाच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. तर परीच्या क्यूटनेसची प्रेक्षकांना भूरळ पडली. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. आता ही मालिका लवकरच परतणार असल्याचे बोललं जात आहे. नुकतंच अभिनेता श्रेयस तळपदेने त्याचे संकेत दिले आहेत.
श्रेयस तळपदे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो आणि माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर एकत्र दिसत आहे. “वो घड़ी जिसका आप सभी को इंतजार था …. आमची ही रेशीमगाठ कधीही तूटायची नाही!” असे कॅप्शन श्रेयसने या व्हिडीओला दिले आहे.
श्रेयसच्या या व्हिडीओवर प्रार्थना बेहेरेनेही कमेंट केली आहे. “श्रेयस तळपदे आणि अजय मयेकर सर तुम्हा दोघांसाठी माझ्या तारखा या फ्री आहेत”, असे म्हणते. तर या मालिकेत मीनाक्षी वहिनी हे पात्र साकारणारी अभिनेत्री स्वाती देवल “ही माझ्याही आहेत..मी ही free आहे….miss that days”, अशी कमेंट करते.