मराठी मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये जुई गडकरीच्या नावाचाही समावेश आहे. जुईने छोट्या पदड्यावर उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘पुढचं पाऊल’, ‘सरस्वती’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. आता तिने तिच्या चाहत्याच्या एका प्रश्नाला दिलेल्या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
या सेशनदरम्यान तिला एका चाहत्याने विचारलं, “जेव्हा तुम्ही लग्न करण्याचा विचार कराल तेव्हा तुमची पसंती एखादा शेतकरी असू शकतो का?” चाहत्याच्या या प्रश्नावर जुईने दिलेलं उत्तर आता चांगलंच चर्चेत आलं आहे. ती म्हणाली, “नक्कीच!! कारण आम्हीपण शेतकरी आहोत.” जुईने दिलेल्या या उत्तराने सर्वांचीच मनं जिंकली.
शेतकरी मुलाशी लग्न करशील का? जुई गडकरीने दिलेलं उत्तर चर्चेत, म्हणाली…
- Advertisement -