छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीचे लाखो चाहते आहेत. प्राजक्तानं आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि सीरिजही केल्या. तिच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ती नेहमीच पुढे असते. प्राजक्ताचे चाहते तिच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन असतात. ती काय करते काय नाही करत… दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून प्राजक्ता माळीच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या.
अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. प्राजक्ता कायमच तिचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर करते असते. अभिनेत्रीचा प्राजक्तराज हा दागिन्यांचा ब्रँण्ड आहे. ती नेहमीच तिच्या दागिन्यांची जाहिरातही सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असते. तर कर्जतला तिचं प्राजक्तकुंज नावाचं फार्महाऊस आहे. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.
खरंतर प्राजक्ता माळीचे चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्रीच्य लग्नाची अफवा बऱ्याचदा उडाल्याचंही आपण पाहिलं आहे. मात्र आता प्राजक्ता लग्नाच्या कपड्यात दिसल्यामुळे ती लग्नबंधनात अडल्याची सोशल मीडियावर अटकळ बांधली जातेय. मात्र आता आम्ही तुम्हाला या व्हिडीओमागचं सत्य सांगणार आहोत. समोर आलेला हा व्हिडीओ सध्या प्राजक्ता माळीने स्वत: सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
मात्र व्हायरल होणार हा व्हिडीओ एका जाहिरातीचा आहे. ज्यामध्ये प्राजक्ता नवरीसारखी नटल्याचं दिसत आहे. प्राजक्ताने यावेळी मरुन रंगाचा सुंदर घागरा घातला आहे. याचबरोबर या लूकला साजेसे सुंदर असे दागिनेदेखील घातले आहेत. प्राजक्ताचा हाच लूक पाहून चाहते तिच्या लग्नाची अटकळ बांधत होते मात्र हा व्हिडीओ तिचा लग्नाचा नसून एका जाहिरातीचा आहे. सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. प्राजक्ताचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.
प्राजक्ता आता फक्त एक अभिनेत्री नाही तर त्यासोबत ती एक बिझनेस वूमन देखील आहे. तिचं स्वत: चं एक दागिन्यांचं ब्रँड असून ती प्राजक्ताराज असं त्या ब्रँडचं नाव आहे. प्राजक्ता हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना दिसते. तिचे कार्यक्रमातील लूक हे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.