Sunday, December 8, 2024

शाहरुख खान याच्यासोबत मराठमोळी प्राजक्ता माळी; व्हिडीओ…

मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी.. प्राजक्ता माळी हिने अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. फार लहान – लहान भूमिका साकारत अभिनेत्रीने झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान भक्कम केलं. करियरच्या सुरुवातीस मराठमोळ्या प्रजक्ता माळी हिने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याच्यासोबत स्क्रिन शेअर केली. खुद्द अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने शाहरुख खान याच्यासोबत कोणत्या सिनेमात स्क्रिन शेअर केली… याबद्दल सांगितलं आहे. सध्या सर्वत्र सोशल मीडियावर अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

माळी म्हणाली, ‘स्वदेस नावाचा एक सिनेमा आहे. सिनेमातील एका सीनमध्ये अभिनेत्री एका लायब्ररीमध्ये पैसे विसरते आणि तो (शाहरुख खान) तिचे पैसे देण्यासाठी बाहेर येतो. बाहेर येत असताना शाहरुख दोन मुलींना धडकतो. त्या दोन मुलींमध्ये एक मी आहे..’ असं म्हणत अभिनेत्री शाहरुख खान याच्यासोबत असलेल्या आठवणी ताज्या केल्या..

अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय कलाकारांसोबत काम करण्याचं प्रत्येक नव्या कलाकारचं स्वप्न असतं. अभिनय क्षेत्रात सुरुवातीच्या काळात शाहरुख खान याच्यासोबत काम करता आल्यामुळे प्राजक्ता प्रचंड आनंदी होती

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles