सध्या अनेक मराठी कलाकार शहराच्या धाकाधाकीच्या जीवनातून लांब जात छोट्याशा गावात रमलेले दिसत आहेत. कोणी मित्र मैत्रिणींबरोबर ट्रीपला गेलं आहे, तर कोणी आजोळी गेलं आहे. आता यामध्ये आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. पण खेडेगावात जाऊन रमण्याचं तिचं कारण वेगळं आहे.
ही अभिनेत्री म्हणजे समिधा गुरु. आतापर्यंत समिधा अनेक मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. आता तिने पोस्ट केलेला एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती गावाकडचं जीवन जगताना दिसत आहे.समिधाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये समिधा बाहेरील असलेल्या तुळशीला नमस्कार करताना दिसत आहे, बाहेर ठेवलेल्या टोपल्या एकत्र करताना दिसत आहे, तर उखळही वापरताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सुंदर निसर्ग दिसत आहे. हे आहे तिचं शूटिंग लोकेशन. ती या ठिकाणी गेली आहे कारण ती लवकरच एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्याचं शूटिंग या ठिकाणी सुरू आहे.