अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकरभरती प्रक्रिया वादग्रस्त ठरत आहे. आधी जादा अनुभव नसलेल्या कंपनीला भरती प्रक्रिया राबविण्याचे काम देण्यात आले. आता ७०० पदे भरली जात असताना आरक्षण नसल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकारावरून संताप व्यक्त केला आहे. आ. आव्हाड यांनी म्हटले आहे की,
आरक्षण विरोधी धोरणे
आरक्षण विरोधी धोरणे
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत ७०० पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलीय ….
विशेष म्हणजे ह्या सर्व भरती प्रक्रियेत आरक्षण ठेवण्यात आलेले नाहीये.
भारतीय जनता पक्षाशी संबंधित मंत्र्यांचे ह्या बँकेवर प्रभुत्व आहे…..मला प्रश्न हा पडलाय सहकार विभाग आणि राज्य सरकार काय करत आहेत.
त्यांची सुद्धा आरक्षण विरोधी भूमिका असेल तर त्यांनी स्पष्ट करावं.
जनता जनार्दन न्याय करेल