Monday, June 17, 2024

शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया ३ जुन पासून सुरू

शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया ३ जुन पासून सुरू
अहमदनगर दि. २ जुन :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागा अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शैक्षणिक सत्र 24 -25 या वर्षातील प्रवेश प्रक्रिया दिनांक 3 जून 2024 पासून सुरू होत असल्याची माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री एस डी शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या प्रवेशा बाबतची जाहिरात संचालनालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आली असून अहमदनगर जिल्ह्यात एकूण 16 शासकीय व 29 अशासकीय खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून अनुक्रमे 2752 व 4304 अशा एकूण 7056 जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे प्रवेशासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण व काही अभ्यासक्रमांमधून इयत्ता दहावी अनुत्तीर्ण उमेदवारांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज दिनांक 3 जून 2024 ते 30 जून 2024 या कालावधीत विद्यार्थ्यांना https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भरता येणार आहे. प्रवेश अर्जाची निश्चिती नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून उमेदवारांना करता येईल.
ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी उपलब्ध ऑनलाइन पोर्टलला भेट देऊन प्रवेशाबाबत उपलब्ध माहिती पुस्तिका डाऊनलोड करून आपला अर्ज अचूक भरावा व प्रवेश प्रक्रिये बाबतची संपूर्ण माहिती विद्यार्थी व पालकांनी घ्यावी व याबाबत काही अडचण असल्यास आपल्या नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस भेट द्यावी व प्रवेश प्रक्रिये बाबत संपूर्ण माहिती घेऊनच आपला अर्ज निश्चित करावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
***

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles