वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माजी खा.प्रकाश आंबेडकर यांनी देशात आगामी काळात अराजकता वाढेल असं वक्तव्य केलं आहे. तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात दंगली घडवल्या जाऊ शकतात असंही वक्तव्य काही दिवसांपूर्वी त्यांनी केलं होतं. यावरून केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली होती.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, त्या चिंधी चोराने माझ्याशी वाद घालू नये. मी एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष असलो तरी आपल्या देशातील अनेक अधिकारी हे बाबासाहेब आंबेडकर यांना देशाचे जनक मानतात. तेच अधिकारी मला ही माहिती देत असतात. मी त्या नारायण राणेंना एवढंच सांगतो, त्या चिंधी चोराने माझ्याशी वाद घालू नये. मी बाबासाहेबांचा नातू आहे. मी एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष असलो तरी आपल्या देशातील अनेक अधिकारी हे बाबासाहेब आंबेडकर यांना देशाचे जनक मानतात. तेच अधिकारी मला ही माहिती देत असतात. देशात अशी कुठलीही घटना घडू नये ही त्यांची अपेक्षा असते, म्हणूनच ते मला याची माहिती देतात.