Thursday, March 27, 2025

ॲड. सचिन जगताप ‘शंभूगर्जना’ पुरस्काराने सन्मानित… सामाजिक कार्याचा गौरव…

नगर -ॲड सचिनभाऊ अरुणकाका जगताप यांना किल्ले धर्मवीर गडावर शंभूगर्जना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने किल्ले धर्मवीरगड, पेडगाव ता. श्रीगोंदा जि.अहमदनगर येथे बलिदान स्फूर्ती दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
सचिनभाऊ जगताप यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना “शंभूगर्जना” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
जगताप घराण्याचा लोकसेवेचा वारसा पुढे घेऊन जाणारे सचिनभाऊ जगताप हे अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असून मांडवगण गटाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे. त्यांच्या पत्नी सुवर्णाताई जगताप या सध्या या गटाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
अहमदनगर शहरातील नामांकित कै. गंगाधर गुणे शास्त्री आयुर्वेद महाविद्यालयाचे सचिव म्हणून सचिन जगताप कार्यरत आहेत,
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून मराठा अश्वदळाचा महत्वाचा घटक असलेल्या भीमथडी जातीच्या अश्वांना केंद्र सरकारने नुकतीच अधिकृत मान्यता दिली असून या कार्यात सचिन जगताप यांनी मोलाची भुमिका बजावली आहे…
अहमदनगर शहरातील कलाकारांना चित्रपट, कला, सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळावी यासाठी सचिन जगताप हे सध्या अहमदनगर शहरात चित्रपट सृष्टी उभी रहावी यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षी अहमदनगर शहरात त्यांनी पहिल्या अरुणोदय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले. यामध्ये देश विदेशातून ३०० हून अधिक असून चित्रपटांनी सहभाग नोंदवला आहे. अरुणोदय ए.जे. प्राॅडक्शनच्या माध्यमातून त्यांनी शहरातील कलाकार, तंत्रज्ञ यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
सचिन जगताप हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून अहमदनगरकरांना परिचित आहेत. प्रगतशील शेतकरी, समाजकारणी, राजकारणी, कलाप्रेमी, अश्वप्रेमी म्हणून ते कार्यरत आहेत.
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज श्री विक्रमसिंह बाजी मोहिते, येसाजी कंकाचे वंशज श्री आकाश राजे कंक व नेतोजी पालकर यांचे वंशज श्री गणेश पालकर, घनश्यामआण्णा शेलार, डॉ. प्रणोती जगताप, शुभांगीताई पोटे, पो.नि. ज्ञानेश्वर भोसले, ज्योतीताई खेडकर, सिमाताई गोरे, संदीप बोदगे साहेब, प्रतिभाताई झिटे, मिराताई शिंदे, पेडगावचे सरपंच इरफान पिरजादे, डॉ. निलेश खेडकर, बाळासाहेब धोत्रे, सर्व पत्रकार बांधव, विविध गावांचे सरपंच आणि ग्रामस्थ, आसपासच्या सर्व शाळेतील विद्यार्थी व महाराष्ट्र भरातुन आलेले छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीचे पदाधिकारी व शंभूप्रेमी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles