अभिनेता आमिर खान लवकरच कमबॅक करणार असल्याची चर्चा सुरू झाली. ‘पिंकव्हीला’च्या एका रिपोर्टनुसार आमिर खान लवकरच ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकमध्ये झळकणार असल्याची चर्चा सुरू झाली. दिनेश विजन हे या चित्रपटाची निर्मिती करत असल्याचंही समोर आलं.
‘पाताल लोक’सारखी सीरिज आणि ‘किल्ला’सारखा चित्रपट दिग्दर्शित करणारे अविनाश अरुण यांनी नुकतंच यावर भाष्य केलं आहे. इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना अविनाश म्हणाले, “मला ठाऊक नाही की ही बातमी बाहेर कशी आली पण अद्याप काहीही ठोस गोष्ट आमच्या हातात नाहीये. अजूनही सगळं प्राथमिक स्तरावरच आहे. या सगळ्यावर चर्चा सुरू आहे, त्यामुळे आत्ता जे काही तुमच्यापर्यंत पोहोचतय त्या सगळ्या सांगीवांगी बातम्या आहेत.”