Thursday, July 25, 2024

सुरक्षित व फायदेशीर, एथर Rizta या नवीन फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर अहमदनगरमध्ये

एथर Rizta या नवीन फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटरचे अनावरण.
स्ट्रॉंग बिल्डअप असणारी, एथर Rizta इलेक्ट्रिक स्कूटर कुटुंबासाठी सुरक्षित व फायदेशीर ठरणार – आमदार संग्राम जगताप.
अहमदनगर (प्रतिनिधी)- एथर RIZTA या नवीन फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटरचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शोरूमचे संचालक रितेश नय्यर, काकाशेठ नय्यर, लालूशेठ नय्यर, हितेश ओबेरॉय, सुरेश बनसोडे, सावंत छाब्रा, वीरेंद्र ओबेरॉय, हर्षल भंडारी, अमन वाही, हर्ष ओबेरॉय, मोसिन मिर्झा, इरफान शेख, भूषण ओस्तवाल आदीसह ग्राहक उपस्थित होते.
यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, एथर RIZTA ही इलेक्ट्रिकल स्कूटर स्ट्रॉंग बिल्डअप असणारी, प्रत्येक कुटूंबासाठी सुरक्षित व परवडणारी फॅमिली स्कूटर आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होण्या आधीच मोठया प्रमाणात बुकिंग झाली आहे. त्याचबरोबर नगरमध्ये इलेक्ट्रिकल वाहनांचा व्यवसाय वाढवून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे काम नय्यर कुटूंबाने केले आहे.
इतर बऱ्याच इलेक्ट्रिक गाड्या असताना देखील नागरिकांच्या मनात एक फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर असली पाहिजे अशी भावना निर्माण असते. व या इलेक्ट्रिक स्कूटरमुळे आपला शहर, जिल्हा व राज्य प्रदूषणमुक्त होईल असल्याची भावना व्यक्त केली तर एथर या नूतन शोरूम चे संचालक रितेश नय्यर म्हणाले की, इलेक्ट्रिकल स्कूटर एथर RIZTA या मॉडेलचे अनावरण करण्यात आले असून ही नागरिकांना योग्य दरात परवडणार असून उत्कृष्ट क्वालिटी व संपूर्ण ॲल्युमिनियम चेसीस्, डिजिटल डिस्प्ले, स्पीड कंट्रोल, ऑटोहोल्ड, लाईव्ह लोकेशन, मोबाईल अ‍ॅप, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल, अँटीथेफ्ट अलार्म सिस्टिम, रिव्हर्स गियर, आलेक्सा सपोर्ट, डिस्क ब्रेक अजून बरेच फिचर्स असून ३ वर्ष बॅटरी वॉरंटीसह ५ वर्षापर्यंत अपग्रेड करता येईल. ही स्कूटर ७ वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहे. लवकरच आपल्या महाराष्ट्रात मध्ये एथर एनर्जी चा नवीन प्लांट सुरु होत आहे. एथर RIZTA ही इलेक्ट्रिकल स्कूटर मध्ये २.९ kwh आणि ३.७ kwh हे तीन मॉडेल उपलब्ध असून याची शोरूम किंमत १,०९९९९ रुपये पासून सुरू होते. तसेच एथर RIZTA फायनान्स देखील उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: 75 0787 7777.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles