नेप्ती नाका, कल्याण रोड, सीना नदी वरील रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न
कल्याण रोड सीन नदीवर पुलाचे काम पूर्ण झाल्या नंतर परिसराला सुशोभी करणाचे रूप प्राप्त होईल – आ.संग्राम जगताप
नगर कल्याण रोड परिसर हा नगर शहराचे मोठे उपनगर निर्माण झाले असून या ठिकाणी मोठी लोक वस्ती निर्माण झाली आहे. येथून राष्ट्रीय महामार्ग जात असून सीना नदीवरील पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या भागातील रस्ता अत्यंत खराब झाला असून तात्पुरत्या स्वरूपात रस्ता कॉंक्रिटी करण्याचे काम हाती घेतले आहे. गणपतीचे दिवस जवळ येत असून कल्याण रोड शिवाजीनगर परिसरामध्ये गणपतीचे मोठ-मोठे कारखाने या ठिकाणी असून राज्यभरातील नागरिक, मित्र मंडळ गणपती खरेदीसाठी येत असतात तसेच नेप्ती नाका बारावेमध्ये शहरातील मानाच्या गणपती पासून ते घरगुती गणपती पर्यंतचे विसर्जनाचे काम मोठे भक्ती भावाने नागरिक करत असतात. यासाठी तातडीने रस्त्याचे काम मार्गी लागणे गरजेचे होते म्हणून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाली होती आता लवकरच सीना नदीवरील पुलाचे व रस्त्याचे काम मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
यावेळी आ.संग्राम जगताप, प्रा.अरविंद शिंदे, माजी सभापती संजय गाडे, वैभव वाघ, विकी वाघ, गणेश दातरंगे, इं.विजय कुमार पाधीर, चंद्रकांत भिंगारदिवे, हरिभाऊ येलदंडे, शरद दातरंगे, सनी दातरंगे, विनायक वाहक, स्वामी येलदंडी, राजू कोंडके, विनीत गाडे, युवराज गुंजाळ आदि उपस्थित होते.
कल्याण रोड सीना नदीवरील पुलाचे काम मार्गी लागावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला असून सुमारे 27 कोटी रुपयांचे निधी उपलब्ध झाला आहे प्रत्यक्षात पुलाच्या कामाला देखील सुरुवात झाली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कल्याण रोड परिसराला सुशोभी करणाचे रूप प्राप्त होईल असे मत आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले