राजकारण राजकीय पातळीवर करा, व्यापारांच्या पोटावर पाय देऊ नका
व्यापारी व कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आणू नका ; फुल व्यापारी मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार
अहमदनगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटच्या आवारात १९९७ सालापासून २५ ते ३० व्यापारी फुलाचा व्यवसाय करत असून जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने विविध प्रकारचे फुलं येथे विक्रीसाठी घेऊन येतात त्यांना या ठिकाणी फुलांची एक चांगली बाजारपेठ निर्माण झाली आहे शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी फुल विक्रेत्यांच्या गाळ्यांच्याविरोधात अर्ज करून गाळे पाडण्यासाठी पाठपुरावा करत आहे, त्यामुळे व्यापारी व कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी व द्वेषाने फुल व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे, राजकारण राजकीय पातळीवर करा, व्यापारांच्या पोटावर पाय देऊ नका. फुल विक्रेते हे आता दिलीप सातपुते विरोधात आक्रमक झाले असून लवकरच मुख्यमंत्र्यांकडे त्यांची तक्रार करणार असल्याचा इशारा फुल व्यापाऱ्यांनी दिला मार्केट यार्ड येथे फुल विक्रेते यांची बैठक पार पडली यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, बापूसाहेब जासुद, अजय गारदे, वसंत आगरकर, संतोष गोंधळे, दिलीप आसमर , मुश्ताक सय्यद, लियाकत सय्यद, नसीम खान, सचिन मेहेत्रे, रशीद खान, अयाज शेख, अनिकेत आगरकर, सूरज कोके, शब्बीर सय्यद, राहुल शेरकर, बाबासाहेब ठोकळ, किरण जाधव, मछिंद्र कातोरे, कैलास धाडगे,अजय तिवारी, प्रकाश आगरकर आदी उपस्थित होते. आधीच फुल विक्रेते गेल्या ३ वर्षांपासून कोविडमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत , याचबरोबर फुलांना देखील भाव मिळत नव्हते, त्यामुळे शेतकरी व व्यापारी हवालदिल झाले होते, त्यातच फुल विक्रेत्यांचे गाळे पाडण्याचा निर्णय झाला, दिलीप सातपुते साहेब, आमची रोजीरोटी बंद करून तुम्ही आमच्यावर का अन्याय करत आहे, ? तुमच्या वाद ज्या लोकांशी आहे त्यांच्याशी वाद घाला, नाहीतर आम्हांला तरी फासावर चढवा अशी संतप्त प्रतिक्रिया फुल व्यापाऱ्यांनी यावेळी दिली, तसेच आज आमच्यावर वेळ आहे, उद्या तुमच्यावर वेळ येईल, तुमची घरे, हॉटेल्स अनधिकृत असल्यास पाडावी, तुमच्या दुश्मनीसाठी आमचा बळी देऊ नका, आम्ही खूप साधी लोकं आहोत, आमची दुकाने पाडून तुम्हाला काय मिळणार ? तुम्ही लोकांना सांगता की आम्ही काही करत नाही मात्र तुम्हीच ३ नोव्हेंबर २०२३ ला मुख्यमंत्रांना पात्रातून सांगितले की यांचे गेले पडून टाका.. असे का करता ? तुमचे पात्र आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले, तुम्ही खोट्या शपथा घेता, जर तुम्ही आमच्या व्यवसाय आणि घरापर्यत येत असाल तर आम्ही रस्त्यावर उतरू, लवकरच फुल विक्रेते यांची कमिटी मुख्यमंत्री यांची लववरच भेट घेऊन तुमच्या पक्षाचे पदाधिकारी आमचे गेले पाडा असे सांगतात, आणि तुम्ही त्यांना स्वतःचे घर हॉटेल्स अनधिकृतपणे बांधण्याकरीत परवानगी देतात, रस्त्यावर गाळे बांधून त्याचे भाडे खाता आणि आम्हांला रस्त्यावर आणतात, असे नाही चालणार. दोन नंबरचे धंदे करतात ते मुख्यमंत्र्यांना चालते का ? तुम्ही नगर मध्ये पदाधिकाऱ्यांच्या निवडी चांगले काम करण्यासाठी केल्या की त्रास देण्यासाठी केल्या ? मुख्यमंत्री साहेब, तुम्ही यांना आवरा, तुम्ही अशा पदाधिकाऱ्यांवर कधी कारवाई करणार ? शिवसेना पक्षाचे व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार संपवण्याचे काम पदाधिकारी करत आहे, मार्केट यार्ड मधील व्यापाऱ्यांना आता एकजूट होण्याची वेळ आली आहे असे या बैठकीत सांगण्यात आले आहे.