Agri News संजय थेटे या तरुण शेतकऱ्यानेही यातून चांगले उत्पन्न कसे कमावते येते, हे सिद्ध करुन दाखवले आहे. बीड येथील संजय थेटे हे मागील दीड वर्षांपासून ड्रॅगन फूटच्या माध्यमातून अगदी चांगली कमाई करत आहेत. 5 एकरमध्ये लागवड केलेल्या ड्रॅगन फूटसाठी त्यांना सुरुवातीला 4 ते 5 लाख रुपयांचा खर्च आला होता. 5 एकर मध्ये लागवड केलेल्या ड्रॅगन पुढच्या माध्यमातून संजय थेटे वर्षाला कमीत कमी 9 ते 10 लाख रुपयांची कमाई करत आहेत. त्यांच्यापासून इतर शेतकरी हे नक्कीच प्रेरणा घेऊ शकतात आणि आपल्या शेतातही चांगले उत्पन्न मिळवू शकतात. हा व्यवसाय सुरू करण्यामागे संजय थेटे यांचं आंतरपीक घेण्याचा उद्देश होता. अगदी त्याचप्रमाणे त्यांनी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून आंतरपिकांचा फायदा देखील घेतला. सद्यस्थिती पाहता ड्रॅगन फूटच्या माध्यमातून संजय थेटे हे अगदी चांगली कमाई करत आहेत. त्यांनी या पिकाला उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत बनवले आहे.