Monday, April 28, 2025

राज्यात पहिलीपासून आता ‘या’ नवीन अभ्यासक्रमाचा समावेश…मंत्री केसरकर यांची माहिती

देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा कृषी विषय आहे. यामुळे शेतीचे शास्त्रशुद्ध ज्ञान मुलांना लहानपणापासून दिले जाणार आहे. मुलांना शेतीचे ज्ञान झाल्यास ते व्यावहारिक शेती करु शकतात. यामुळे राज्यात पहिलीपासून कृषी विषय अभ्यासक्रमात शिकवण्यात येणार आहे. कृषी विषयासाठी नवीन मसुदा तयार झाला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात कृषी विषय असणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे आयोजित कार्यक्रमासाठी दीपक केसरकर दापोलीत आले होते. यावेळी त्यांनी ‘टीव्ही९ मराठी’शी बोलताना शालेय अभ्यासक्रमातील बदल आणि इतर बाबींवर चर्चा केली. दीपक केसरकर म्हणाले, मुलांना मातृभाषेतून म्हणजेच मराठीमधून चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. शालेय शिक्षणात शेती अभ्यास शिकवण्यात येणार आहे. राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरणाचा विचार असला तरी शाळा बंद करण्याचा सरकारचा विचार नाही. महाराष्ट्रातला एकही शिक्षक बेरोजगार होणार नाही. ‘माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान मुख्यमंत्र्यांनी सुरु केले असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles