Sunday, December 8, 2024

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढणार? न्यायालयाने दिले खटला चालवण्याचे आदेश

एकीकडे राज्यातील युती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांनी 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत खोटी माहिती दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणी सिल्लोड न्यायालयाने सत्तार यांच्यावर लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. सिल्लोडचे सामाजिक कार्यकर्ते महेश शकरलाल शंकरपेल्ली, पुण्यातील डॉ. अभिषेक हरिदास यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती.

याप्रकरणी दीड वर्षे सत्यता पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आता सत्तार यांना न्यायालयात स्वतः हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले, असल्याची माहिती याचिकाकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी दिली.

याचिकेनुसार अब्दुल सत्तार यांनी 2014 व 2019 सिल्लोड व सोयगाव विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या शेतजमीन, व्यापार संकुल, निवासी इमारत याविषयी तसेच आपल्या शिक्षणाच्या संदर्भात खोटी, अपुरी माहिती दिली व आवश्यक ती माहिती लपवली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles