शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्यासाठी व्हाटसअप क्रमांक..कृषीमंत्री धनंजय मुंडेंचा निर्णय

0
27

काही खत विक्रेते शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचा खत खरेदी करण्यासाठी सक्ती करतात. बोगस खत विकून फसवणूक करतात. शेतकरी खतविक्रेत्यावर विश्वास ठेवून खत खरेदी करतात. पण, यात कधी-कधी त्यांची फसवणूक होते. अशा फसवणूक करून खत विक्रेत्यांविरुद्ध शेतकऱ्यांना आता तक्रार करता येणार आहे. त्यासाठी तात्काळ व्हॉट्सअप क्रमांक सुरु करा. तो व्हॉट्सअप क्रमांक शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा. असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाला दिले. धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाचा अडीच तास आढावा घेतला. यावेळी धनंजय मुंडे बोलत होते. कृषी निविष्ठा आणि गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठ्याबाबत त्यांनी मंत्रालयात आढावा घेतला. या बैठकीत अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, सहसचिव गणेश पाटील, संचालक विस्तार आणि सेवा विकास पाटील उपस्थित होते. व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. संबंधित जिल्ह्यातील भरारी पथकांना मेसेज जाईल. संबंधित पथक तपासणी करून कारवाई करेल.