नगर: अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. आता केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा असून तत्पूर्वी गुगलने मॅपवर नामांतरानुसार अहिल्यादेवी नगर लिहिणं सुरू केले आहे. गुगल मॅपवर अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर झळकत असल्याचे पहायला मिळते आहे.