Wednesday, January 22, 2025

नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यासाठी आलेल्या तरूणावर नगर शहरात चॉपर व तलवारने हल्ला

अहिल्यानगर :-नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यासाठी कोपरगाव येथून अहिल्यानगर शहरातील नालेगाव परिसरात आलेल्या तरूणावर चॉपर व तलवारने हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला आहे. चेतन रवींद्र निंदाणे (वय 26 रा. कोर्ट रस्ता, कोपरगाव) असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नालेगावच्या मारूती मंदिराजवळ, टांगे गल्लीत ही घटना घडली.

दरम्यान, जखमी चेतन निंदाणे याने उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तिघांविरूध्द मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न, मारहाण, शिवीगाळ, आर्मअ‍ॅक्ट आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितु सुरेश चव्हाण (वय 45), रोहन जय चव्हाण (वय 25), दाद्या ऊर्फ सुनील जाधव (वय 27, तिघे रा. मुन्सीपल कॉलनी, गोगादेव मंदिरा जवळ, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

चेतन निंदाणे हे नातेवाईकाच्या लग्नासाठी नगरमध्ये आले होते. त्यांचे मामा लक्ष्मण अर्जुन सारसर यांच्या शेजारी राहणार्‍या संशयित आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून चेतन सोबत पुन्हा वाद घातले. या वादातून रोहन याने चॉपरने चेतनवर वार केला. जितुने तलवारीने वार करून खूनाचा प्रयत्न केला.

दाद्या ऊर्फ सुनीलने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चेतन गंभीर जखमी झाल्याने त्यांना नातेवाईकांनी तात्काळ रूग्णालयात दाखल केले. मारहाण करणारे घटनास्थळावरून पसार झाले. मात्र घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मारहाण करणार्‍या संशयितांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक के. एस. सेदवाड करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles