Saturday, January 25, 2025

नगरमध्ये दुकानात घुसून सपासप वार; घटना सीसीटीव्हीत कैद

अहिल्यानगर-बालिकाश्रम रोडवरील बडोदा बँक कॉलनी येथील रहिवासी अभियंता वैष्णवकुमार गंगाधर परदेशी याच्यावर विजय पठारे (रा. सिद्धार्थनगर) याने चाकूने डोक्यावर सपा-सप वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवार दि.१५ डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली आहे. जखमी वैष्णवकुमार गंगाधर परदेशी वय २८ हा रविवारी रात्री स्वतःच्या किरण दुकानात बसला असता अचानक गुंड विजय पठारे याने दुकानात घुसून डोक्यावर सपा-सप वार करून प्राणघातक हल्ला करून शिवीगाळ केली. तू बाहेर ये तुला संपूनच टाकतो अशी जीवे मारण्याची धमकीही पठारे याने परदेशीला दिली आहे. या प्राणघातक हल्ल्यात वैष्णवकुमार परदेशी हा गंभीर जखमी झाला असून त्यावर अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भर वस्तीत वाहत्या रस्त्यावर घडलेल्या या प्राणघातक हल्लाची घटना दुकातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

याबाबत रात्री उशिरा वैष्णवकुमार परदेशी याच्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये विजय पठारे यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हंटले आहे की, दिनाक १५ डिसेंबर रोजी रात्री ८:१५ वाजेच्या सुमारास मी कामावरून आल्यावर माझ्या किराणा दुकानाचे कॉऊंटर वर बसुन मोबाईल पाहत बसलेलो असताना विजु पठारे रा. सिध्दार्थनगर याने विनाकारण दुकानासमोर येवुन अचानक माझ्या डोयात चाकुने वार केला.

त्यावेळी मी माझा भाऊ श्रीनिवास याला आवाज देवुन बोलावले असता विजु पठारे मला म्हणाला तु बाहेर ये आज तुला सपंवुनच टाकतो अशी धमकी देवून मला घाणघाण शिवीगाळ केली. त्यावेळी माझा भाऊ घरातुन बाहेर आला तेंव्हा विजु पठारे याचे घरातील लोक येवुन त्याला त्याचे घरी घेऊन गेले. तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो असता डोक्यातून रक्त येत असल्याने पोलिसांनी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पीटलमध्ये पाठवले.

हल्लेखोर विजय पठारे हा गुंड प्रवृत्तीचा असून त्यांच्यापासून आमच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे पोलिसांनी गुंड वजय पठारे यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हल्यातील जखमी वैष्णवकुमार याचा भाऊ श्रीनिवासकुमार परदेशी याने तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षकांकडे केली आहे.निरिक्षकांकडे केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles