अंबिका महिला बँकेच्या संस्थापक संचालिका व विद्यमान संचालिका सेवानिवृत्त प्राध्यापिका श्रीमती पुष्पाताई मोहनराव मरकड यांचे सकाळी सात वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 76 वर्ष होते त्यांच्यावर आज सकाळी साडेअकरा वाजता अमरधाम अहिल्यानगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मराठा पतसंस्थेचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शाखाध्यक्ष पत्रकार किशोर मरकड व सामाजिक कार्यकर्ते नितीन मरकड यांच्या त्या मातोश्री होत.