शहरातील विविध प्रश्न संदर्भात खा.निलेश लंके यांची महापालिकेत आढावा बैठक संपन्न
सफाई कामगारांच्या प्रश्न संदर्भात खा.निलेश लंकेचा प्रधान सचिवाला फोन…
अहिल्यानगर : शहरातील विविध प्रश्न संदर्भात खा.निलेश लंके यांनी महापालिकेत आयुक्त यशवंत डांगे यांच्या समवेत बैठक घेऊन चर्चा केली यामध्ये 305-506 सफाई कामगारांच्या नोकरीचा प्रश्न प्रलंबित आहे हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आयुक्त यांच्याकडे शासन निर्णयाची व कोर्टाने दिलेल्या अध्यक्षाची प्रत दिली मात्र आयुक्त सकारात्मक निर्णय घेण्यास तयार नसल्यामुळे थेट प्रधान सचिवांशी फोनवरून बोलणे झाले असल्यामुळे हा प्रश्न येत्या दोन-चार दिवसात मार्गी लागेल याचबरोबर 2019 पासून शहरात गॅस पाईपलाईन योजनेचे काम चालू असून ते समाधानकारक नाही महापालिकेने 4 प्रभागांमध्ये काम करण्याची परवानगी दिली असली तरी ते काम अजून पर्यंत पूर्ण झाले नाही तरी ते काम येत्या 4 महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. उर्वरित कामासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करणार आहे नेहरू मार्केट जागेमध्ये महापालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधणार असून या ठिकाणी भाजी विक्रेत्यांना प्राधान्यक्रम देण्यासाठी सूचना केल्या आहे महापालिकेच्या गाळेधारकांच्या भाडेवाडीचा प्रश्न गेल्या 2015 सालापासून प्रलंबित आहे महापालिका आता वसुलीसाठी त्यांचे दुकान सील करीत आहे यावरती तोडगा काढण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे असल्याचे प्रतिपादण खासदार निलेश लंके यांनी केले
शहरातील विविध प्रश्न संदर्भात खासदार निलेश लंके यांनी महापालिकेत आयुक्त यांच्या समवेत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक दीप चव्हाण, शिवसेनेचे नेते राजेंद्र दळवी, गिरीश जाधव, माजी नगरसेवक योगीराज गाडे, भैय्या परदेशी, रेवजी नांगरे, दिलदार सिंगबिर, संजय झिजे अदीसह अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते






