Thursday, March 27, 2025

नगरमध्ये व्यापार्‍यास मारहाण ,महिन्याला पाच हजारांच्या हप्त्याची मागणी

अहिल्यानगर-मी इकडचा डॉन आहे, असे म्हणत कल्याण येथील फळांच्या व्यापार्‍यास नगरमध्ये मारहाण करून महिन्याला पाच हजार रूपये देण्याची मागणी करण्यात आली. पंकजकुमार मुरलीप्रसाद वर्मा (वय 29, रा. लक्ष्मी मार्केट, कल्याण) असे मारहाण झालेल्या व्यापार्‍याचे नाव आहे. ही घटना फेबु्रवारी रोजी सायंकाळी आणि 7 फेबुु्रवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता बागवान यांच्या गाळ्यासमोर फळमार्केट, मार्केटयार्ड येथे घडली. याप्रकरणी वर्मा यांच्या फिर्यादीवरून सॅम उर्फ समीर शेख व इतर दोन अनोळखी इसम (रा. नगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्मा यांनी फिर्यादीत म्हटले की, 4 रोजी सांयकाळी आणि 7 रोजी सकाळी साडेअकरा वाजता ते बागवान यांच्या फळांच्या गाळ्यासमोर असताना आरोपी त्यांच्याजवळ आले. सॅम उर्फ समीर शेख हा त्यांना म्हणाला की, मुझे अभी पता चला है की, तु यहाँ पर आकर व्यापार करता है. तुझे यहाँ आकर व्यापार करना है तो मुझे पाच हजार रूपये महिना देना पडेगा. तु मुझे जानता नाही है, मै इधर का डॉन हू असे म्हणून शिवीगाळ केली.

शेख व त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी वर्मा यांना मारहाण केली. याप्रकरणी वर्मा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles