Wednesday, January 22, 2025

पाथर्डी व शेवगाव तालुक्यात घरफोडीचे गुन्हे करणारी टोळी जेरबंद…

पाथर्डी व शेवगाव तालुक्यात घरफोडीचे गुन्हे करणारी टोळी गुन्हे शाखेकडून जेरबंद
3 आरोपी 2,17,000/- रू किं मुद्देमालासह ताब्यात, आरोपीकडून 9 घरफोडीचे गुन्हे उघड

—————————————————————————————————————————-
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी सौ.सुमन बाबुराव पालवे, रा.घाटशिरस, ता.पाथर्डी या दिनांक 25/11/2024 रोजी त्याचे कुटुंबियासह लग्नाकरीता बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरटयांनी त्यांचे घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागीने चोरून नेले. याबाबत पाथर्डी पो.स्टे. गुरनं 1132/2024 भा.न्या.सं. 2023 चे कलम 331 (3), 305 (अ) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत सातत्याने घरफोडीचे गुन्हे होत असल्याने मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना ना उघड घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.

नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि/हेमंत थोरात, पोसई/ अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार बबन मखरे, हृदय घोडके, फुरकान शेख, शरद बुधवंत, संतोष खैरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे व अरूण मोरे अशांचे पथक नेमुन घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणणेबाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.

तपास पथक वरील गुन्हयांतील गेला माल व आरोपीचा तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेत असताना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा विनोद उर्फ सुप्या सक्या भोसले, रा.निपाणी जळगाव, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर व त्याचे साथीदारांनी केलेला असून ते सध्या पाथर्डी शहरामध्ये आहेत.पथकाने मिळालेल्या बातमीतील ठिकाणी जाऊन संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) विनोद उर्फ सुप्या सक्या भोसले, वय 25, रा.निपाणी जळगाव, ता.पाथर्डी, जि. अहिल्यानगर 2) सचिन भाऊसाहेब काळे, वय 21, रा.लखमापुरी, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर असे सांगीतले.
तपास पथकाने वरील आरोपीतांना विश्वासात घेऊन, गुन्हयांबाबत विचारपुस केली असता आरोपीतांनी सदरचा गुन्हा हा 3) विकास विठ्ठल भोसले, रा.उमापूर, ता.गेवराई, जि.बीड (फरार) याचे मदतीने केला असल्याची माहिती सांगीतली. तसेच गुन्हयातील चोरलेले काही सोन्याचे दागीने हे 4) लक्ष्मीकांत सांडुशेठ मुंडलिक, रा.सोनार गल्ली, बिडकीन, ता.पैठण, जि.छ.संभाजीनगर
यास विकल्याचे सांगीतल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांनी त्यांचा साथीदार विकास विठ्ठल भोसले यांचेसह मागील दोन – तीन महिन्यात पाथर्डी व शेवगाव तालुक्यात वेगवेगळया घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे दिलेल्या माहितीवरून, पाथर्डी व शेवगाव पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील घरफोडीचे 09 गुन्हे उघडकिस आणले आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles