नगर (प्रतिनिधी)- शहरातील एमआयडीसी मधील रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज लाईन, कचरा, टपऱ्यांचे अतिक्रमण आदी समस्या सोडविण्याबाबत एमआयडीसीचे मुख्य अभियंता (मुंबई) नितीन वानखेडे यांच्यासोबत नगर मधील उद्योजकांची बैठक पार पडली. यावेळी वानखेडे यांनी सदर समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी एस.ई. राहुल तिडके, कोथवड (ई.ई. पुणे), आर.पी. थोटे, एमआयडीसीचे उपअभियंता बडगे आदींसह उद्योजक उपस्थित होते.
या बैठकीत एमआयडीसीतील महत्त्वपूर्ण समस्या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. उद्योजकांच्या वतीने विविध प्रश्नांचे निवेदन एमआयडीसीचे मुख्य अभियंता वानखेडे यांना देण्यात आले.
सन फार्मा ते निंबळक रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. ते काम सीईओ यांना भेटून मार्गी लावण्यात येईल. त्यामध्ये असणारी खड्डे 8 ते 10 दिवसांमध्ये बुजविली जाणार आहेत. एमआयडीसीतील अंतर्गत रस्ते व साईड पट्ट्यांची कामे एक महिन्यामध्ये पूर्ण केली जातील. पंपिंग स्टेशन ते एमआयडीसी नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम लवकच करण्यात येईल. एल ब्लॉक मधील गटारीमुळे कंपन्यांमध्ये पाणी जात असून, त्याचे नियोजनाचे काम एक महिन्यात पूर्ण केले जाणार आहे. भूमिगत गटारी एका महिन्यात स्वच्छ करण्यात येतील. एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यालगत असणारी झाडे-झुडपे एक महिन्यात काढण्यात येतील. एम ब्लॉक मध्ये रस्त्यावरील कचऱ्यामुळे त्या भागात अतिशय दुर्गंधी पसरत आहे, त्यासाठी दर 15 दिवसांनी जेसीबीच्या सहाय्याने कचरा उचलण्यात येईल. एमआयडीसी मध्ये टपऱ्यांचे अतिक्रमण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे तरी ते लवकरच काढण्यात येईल. स्ट्रीट लाईटचा लुमिनियस (होलटेज) कमी असल्यामुळे पुरेसा प्रकाश पडत नाही, त्यासाठी लवकरच नवीन बल्ब बसिवण्यात येणार असल्याचे आश्वासन उद्योजकांच्या शिष्टमंडळास एमआयडीसीचे मुख्य अभियंता वानखेडे यांनी दिले.
या बैठकीसाठी जयद्रथ खाकाळ, महेश इंदाणी, प्रफुल पारख , निनाद टिपुगडे, अमोल घोलप, सागर निंबाळकर, राजेंद्र कटारिया, सचिन पाठक, सतीश गवळी, प्रसन्न कुलकर्णी, गणेश बेरड, सुमित लोढा, प्रमोद मोहोळे, सचिन काकड आदी उपस्थित होते.
एमआयडीसीचे विविध प्रश्न लवकरच सुटणार…मुख्य अभियंता वानखेडे यांचे आश्वासन
- Advertisement -