चांगला उद्योजक मित्र गमावला -जयद्रथ खाकाळ
नगर (प्रतिनिधी)- लहान-मोठ्या उद्योजकांना चालना देण्यासाठी अशोक सोनवणे यांनी एमआयडीसीत आमी संघटनेची स्थापना केली. एमआयडीसी मधील उद्योजकाना कसा न्याय मिळेल? यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. शासनस्तरावर पाठपुरावा वेळप्रसंगी संघर्ष करण्यासही ते मागे हटले नाही. त्यांच्या निधनाने चांगला उद्योजक मित्र गमावला गेला असल्याची भावना आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांनी व्यक्त केली.
एमआयडीसी येथे आमी संघटनेच्या वतीने उद्योजक तथा आमी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व. अशोक सोनवणे यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खाकाळ बोलत होते. याप्रसंगी राजेंद्र कटारिया, सुमित लोढा, संजय बंदिष्टी, अरुण कुलकर्णी, प्रवीण बजाज, अरविंद पारगावकर, सतीश गवळी, बालकृष्ण नरोडे, बाळासाहेब विश्वासराव, मिलिंद गंधे, विवेक हेगडे, सुनील मनोत, सुनील कानवडे, भिंगारे कारभारी, निनाद टिपू गडे, भांबारकर, शिंदे, महेश इंदानी, अभिजीत शिंदे, अक्षय वाघमोडे, अण्णा खांडरे, संदीप कोदरे, पांडुरंग ढवळे, मिलिंद कुलकर्णी, दिनेश अग्रवाल, प्रशांत विश्वासे आदींसह संघटनेचे सर्व सदस्य व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे खाकाळ म्हणाले की, सर्वात प्रथम जकातचा विषय सोनवणे यांनी मार्गी लावला. एमआयडीसी मधील कामगारांचे हित सुध्दा त्यांनी पाहिले. आमीच्या मार्फत एमआयडीसी जागेचा विषयसह अनेक विषय त्यांनी मार्गी लावले. त्यांच्या निधनाने एमआयडीसी मध्ये खुप मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.