बुरुडगाव रोड स्वाती कॉलनी येथे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न
आता मनपाच्या निवडणुका येतील अन् नवीन लोक विकासाच्या गप्पा मारतील – आ. संग्राम जगताप
अहिल्यानगर : शहराची ओळख ही दोन वेशीच्या आतली होती, गेल्या दहा-बारा वर्षापासून शहराचा विस्तार कसा वाढवता येईल याकडे नियोजन करीत लक्ष दिले, नागरिकांना विकासाच्या मूलभूत सुविधांपासूनची सर्व कामे मार्गी लावली, त्यामुळे नागरी वसाहती झपाट्याने वाढत शहराच्या चारही बाजूला नवीन उपनगरे तयार झाली, बुरुडगाव रोड परिसराची विकसित व सुरक्षित उपनगर म्हणून ओळख निर्माण झाली. त्यामुळे शहरातील नागरिक या भागामध्ये राहण्यासाठी पसंती देत आहे, शहरातील काही स्वयंघोषित पुढारी राजकारणाकडे करिअर म्हणून पाहत असतात मात्र आम्ही विकासात्मक कामातून सेवा म्हणून पाहत आहोत, शहराचे वैभव कसे वाढेल यासाठी आम्ही सर्व विषयावर काम करत आहोत आता महापालिकेच्या निवडणुका येतील त्यावेळी नवीन लोक विकासाच्या गप्पा मारतील मात्र निवडणुका संपल्या की गायब होतील आम्ही मात्र निवडणुकीपुरते काम करत नसून पाचही वर्ष जनतेत राहून विकासाचे कामे मार्गी लावत असतो, माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी बुरुडगाव परिसराच्या विकास कामांसाठी पाठपुरावा केल्यामुळेच या परिसराला वैभव प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
बुरुडगाव रोड स्वाती कॉलनी येथे माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या पाठपुराव्यातून आणिआमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉंक्रिटीकरणकामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला, यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, बाळासाहेब वाघ, संजय भंडारे, पत्रकार शिल्पा रसाळ, निखिल रसाळ, माया धोका आधीच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप यांनी शहर विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे नागरिकांचे प्रश्न जलद गतीने मार्गी लागत आहे, त्यामुळे नागरिकही समाधान व्यक्त करत आहे, स्वाती कॉलनीतील नागरिकांनी माझ्याकडे रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी पाठपुरावा केला मी ते काम आ. संग्राम जगताप यांना सांगितले व ते तातडीने मार्गी लागले आज या कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे. विकास कामातून नागरिकांचे समाधान होत आहे असे मत माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केले.
आमदार संग्राम जगताप बालपणी चाणक्य चौकात राहत होते त्यावेळी ते आमच्या स्वाती कॉलनीमध्ये खेळण्यासाठी यायचे असते, आपल्या शहराचे तिसऱ्यांदा आमदार झाले याची आम्हाला कौतुक आहे, त्यांच्या हातून नगर शहराचा विकास कामातून कायापालट होत असल्याचे मत ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब वाघ यांनी व्यक्त केले