Thursday, March 27, 2025

अहिल्यानगर मनपावर हिंदू धर्म विचाराची सत्ता बसविणार – आ.संग्राम जगताप

प्रेमदान हडको येथे दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार व सभामंडप उभारणी कामाचे भूमिपूजन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न

अहिल्यानगर मनपावर हिंदू धर्म विचाराची सत्ता बसविणार – आ.संग्राम जगताप

अहिल्यानगर : केंद्र व राज्यामध्ये हिंदू धर्माचे संरक्षण करणारी सत्ता आहे आता पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेवर देखील हिंदू धर्म विचाराची सत्ता बसवणार आहे. शहर विकासाच्या योजनांबरोबरच आध्यात्मिकतेचा वारसा अखंडितपणे पुढे घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्वांना करावे लागणार आहे. मंदिर उभे राहत असताना लोक वर्गणीची खरी गरज असून धार्मिकतेबाबत आत्मीयता निर्माण होत असते. दक्षिण मुखी हनुमान मंदिर हे प्रेमदान हडको मधील नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी धार्मिकतेचे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे सुसंस्कृत पिढी निर्माण होईल. अयोध्या येथे श्री.प्रभू राम मंदिराच्या उभारणीमध्ये प्रत्येक नागरिकांनी भाग घेतला आहे. तसेच प्रेमदान हडको मधील नागरिकांनी देखील पुढाकार घेत दक्षिण मुखी हनुमान मंदिर उभारणीचे काम हाती घेतले आहे चुकीच्या गोष्टी सहन करणार नसून जिधर आयेंगा आली उधर आयेंगा बजरंग बली अशी घोषणा आमदार संग्राम जगताप यांनी दिली
प्रेमदान हडको येथे दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार व सभामंडप उभारणी कामाचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेवक सतीश शिंदे, करण कराळे, अंजली आव्हाड, विलास शिंदे, मयूर कुलथे, सागर मुर्तडकर, सचिन जगताप, शिवजीत डोके, आप्पा खताडे, किशन गायकवाड, मयूर बांगरे, अमित खामकर, प्रसाद डोके, शुभम भगत, सागर शहाणे, सचिन तुपे, राज मुंडलिक, राहुल राऊत, अभिजीत शिंदे, संतोष शिंदे, प्रसाद कुलकर्णी, मंगेश खिळे, संदीप थोरात, प्रथमेश ढेरे, हर्षल भिजय, बाळू खताळे, तात्या सेंदर आदी उपस्थित होते
विलास शिंदे म्हणाले की प्रेमदान हडको येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिर हे ५० वर्षे पूर्वीचे असून ते भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार व सभा मंडपाचे काम लोकवर्गणीतून होणार असून त्या कामाची भूमिपूजन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. या भागातील नागरिक एकत्र येत वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतात हनुमान जयंती पर्यंत हे मंदिर उभे करण्याचा आमचा मानस आहे असे ते म्हणाले

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles