जागतिक महिला दिनानिमित्त साई श्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्व रोग निदान व तपासणी शिबीर संपन्न
महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्याची जपणूक होणे आवश्यक – आ. संग्राम जगताप
नगर – संपूर्ण राष्ट्रीय आरोग्याचा विचार करता महिलांचे आरोग्य या घटकाला त्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. हे नाकारून चालणार नाही. महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्याचा परिणाम निश्चितपणे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी होऊ शकेल. आज महिलांचे आरोग्य ही चिंतेची आणि चिंतनाची बाब बनली आहे. या महिलांचा विकास लहानपणापासूनच व्हायला हवा. तिच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची जपणूक होणे आवश्यक आहे, साई श्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने वतीने घेण्यात असलेल्या शिबीरामुळे महिलांना आधार मिळेल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त साई श्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल च्या वतीने सर्व रोग निदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विरोधी पक्ष नेता कुमार वाकळे, राष्ट्रवादी महिला आघाडीचे अध्यक्ष सौ. आशाताई निंबाळकर, आशा गायकवाड, हॉस्पिटलचे एमडी फिजिशियन तज्ञ डॉ. अक्षय खटके व मधुमेह तज्ञ डॉ. आशिषकुमार चौधरी, हृदयरोग,सर्जन व पोट विकार तज्ञ डॉ. गजानन वंगल, स्त्री रोग तज्ञ डॉ. प्राजक्ता पानसरे खडके, देवराम मेहेत्रे, अॅड.राहुल मेहेत्रे, व्यवस्थापक रमेश खेडकर, सचिन गरकळ, संदीप सुळ, डॉ. श्रीकांत मेहेत्रे, डॉ. अश्विनी मेहेत्रे , डॉ. ऐश्वर्या माने. डॉ. गोविंद घुले, डॉ. रितेश नितेश यादव आदी उपस्थित होते.
याप्रसंगी हॉस्पिटलचे एमडी फिजिशियन तज्ञ डॉ. अक्षय खटके म्हणाले की, साई श्री हॉस्पिटल हे रुग्णांची सेवा करण्यासाठी आत्याधुनिक पद्धतीने सुरू करण्यात आली असून या हॉस्पिटलला सर्व कॅशलेस पद्धती चालू आहे. भविष्यात कोणत्याही आजारावर उपचार करण्यासाठी साई सेवा साई श्री मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कटिबद्ध आहे. महिला दिनाचे औचित्याने साई श्री हॉस्पिटीलच्या वतीने महिलांना मदतीचा हात मिळावा, या उद्देशाने या शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
याप्रसंगी हॉस्पिटलचे एमडी फिजिशियन तज्ञ डॉ. अक्षय खटके व मधुमेह तज्ञ डॉ. आशिषकुमार चौधरी, हृदयरोग,सर्जन व पोट विकार तज्ञ डॉ. गजानन वंगल, स्त्री रोग तज्ञ डॉ. प्राजक्ता पानसरे खडके, देवराम मेहेत्रे, अॅड.राहुल मेहेत्रे, व्यवस्थापक रमेश खेडकर, सचिन गरकळ, संदीप सुळ, डॉ. श्रीकांत मेहेत्रे, डॉ. अश्विनी मेहेत्रे, डॉ. ऐश्वर्या माने. डॉ. गोविंद घुले, डॉ. रितेश नितेश यादव, स्टॉप सीमा सिस्टर, दुर्गा खेडकर, मेघा इंगळे, पवन साळवे, गौरव डाके, प्रवीण ब्रदर, यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.राहुल मेहेत्रे यांनी केले. तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सौ.आशाताई निंबाळकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
या शिबिरामध्ये मोफत वैद्यकीय तपासणी करून एक्स-रे रक्तातल्या विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या. या शिबिरामध्ये जवळपास 103 रुग्णांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सुत्रसंचान रमेश खेडकर यांनी केले. तर आभार सचिन गरकळ यांनी मानले.
महिला दिनानिमित्त साई श्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्व रोग निदान व तपासणी शिबीर संपन्न
- Advertisement -