अहिल्यानगर : चांगल्या विचारांनी जोडलेली माणसे एकत्र आल्यास तो परिसर नक्कीच विकसित होतो मा.सभापती कुमारसिंह वाकळे यांनी नेहमीच नागरिकांशी थेट संपर्क ठेवला असल्यामुळे बोल्हेगाव नागापूर परिसराचा विकास कामातून कायापालट होत आहे. या ग्रामीण भागाला शहरीकरणाचे रूप प्राप्त करून देण्याचे काम कुमारसिंह वाकळे यांनी केले. मनपा नगरसेवक पदाची मुदत संपली असली तरी तुम्ही जनतेच्या मनातील नगरसेवक आहेत. कामाच्या आणि विचाराच्या माध्यमातून माणसे जोडले असल्यामुळे नागरिक तुम्हालाच कामे सांगतात आणि ते सोडविले देखील जातात. त्यामुळे एकमेकांमध्ये ऋणानुबंध निर्माण झाला आहे आणि तुम्ही लवकरच आजी नगरसेवक होणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
बोल्हेगाव येथील दत्त मंदिर वर्धापन दिनानिमत्त ग्रामस्थांच्या वतीने आमदार संग्राम जगताप आणि मा.सभापती कुमारसिंह वाकळे यांचा नागरिक सत्कार संपन्न झाला. यावेळी मा.महापौर बाबासाहेब वाकळे, मा.उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, मा.सभापती मनोज कोतकर, अविनाश घुले, मा.नगरसेवक निखिल वारे, डॉ.सागर बोरुडे, दत्ता पा.सप्रे, दगडू मामा पवार, बाळासाहेब पवार, शिवाजी चव्हाण, सतीश बारस्कर, रवींद्र बारस्कर, युवराज शिंदे, योगेश गलांडे, बबनराव वाकळे, नितीन शेळके, राजू शेटे, प्रकाश भागानगरे, राजेश कातोरे, योगेश ठुबे, शिवाजी चव्हाण आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चांगले मित्र एकत्र आल्यावरती संकट काळामध्ये एकमेकांना साथ देत असतात मित्रांमुळेच चांगले काम देखील उभे राहत असते आमदार संग्राम जगताप यांनी मला राजकारणात काम करण्याची संधी दिली त्या माध्यमातून मी माझ्या परिसरातील जनतेचे प्रश्न मार्गी लावू शकलो बोल्हेगाव-नागापूर परिसर हे माझे कुटुंब असल्यामुळेच मी दररोज वार्डामध्ये काम करत असतो. मी माझी राजकीय रेषा आखून घेतली असल्यामुळे मी इतर भागांमध्ये हस्त क्षेप करत नाही चांगले काम करत असल्या मुळेच नागरिक देखील सहकार्याची भूमिका घेत असल्याचे मत मा.सभापती कुमारसिंह वाकळे यांनी व्यक्त केले
अहिल्यानगर महानगरपालिका सदस्यांची मुदत संपून १ वर्ष झाले असल्यामुळे आम्ही आता माजी नगरसेवक झालो आहे. तरी आमदार संग्राम जगताप यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून महापालिकेच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्यासाठी प्रयत्न करावे आणि आम्हाला लवकरच आजी नगरसेवक करावे अशी भावना निखिल वारे यांनी व्यक्त केली
आम्ही शहरामध्ये सर्वजण आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत आणि करत राहू. नगर शहराचे राजकारण आमदार संग्राम जगताप यांच्या भोवतीच फिरत आहे आम्हाला कधी राजकारणात विरोधात जायची वेळ आली तर आम्ही राजकारण सोडून देऊ मात्र विरोधात जाणार नाही अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी व्यक्त केले






