झोपडी कॅन्टीन सावेडी नंबर १७५ f प्लॉट नंबर 177 वरील बांधलेल्या इमारतीमधील अनधिकृत बांधकाम पाडून टाका

0
32

नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण मोहिमेमुळे नगरकर मोकळा श्वास घेत आहे, काही राजकीय लोक या अतिक्रमणाला विरोध करीत असून महापालिका दुजाभाव करत असल्याचा आरोप करत पैसेवाल्यांच्या मोठ्या अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी करत आहे, महापालिका प्रशासनाने देखील कारवाईला सुरुवात माऊली संकुल चौक झोपडी कॅन्टीन सावेडी सर्वे नंबर १७५ f प्लॉट नंबर 177 वरील बांधलेल्या इमारतीमधील अनधिकृत बांधकाम पाडून सुरुवात करावी कारण सदर इमारतीमध्ये मंजूर नकाशातील पार्किंग मध्ये अनधिकृत रित्या कमर्शियल गाळा म्हणून वापरण्यात येत असून सदर अतिक्रमणामुळे इमारतीमधील ग्राहक व विक्रेते पार्किंगची सोय नसल्यामुळे गाडी रस्त्यावर उभी करतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तरी सदर अतिक्रमण त्वरीत काढून टाकण्यात यावे व पार्किंगची व्यवस्था पुर्ववत करण्यात यावी अशी मागणी आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी केली यावेळी राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, सुशांत जाधव, निलेश घुले, सोमनाथ जाधव, बापूसाहेब अवताडे आदी उपस्थित होते.
चितळे रोड, नेहरू मार्केट जवळील इमारतीवरील अनाधिकृत टॉवरवर कारवाई करावी, तसेच बांधकामाची मंजुरी घेतली नसून त्यांच्याकडून आतापर्यंतचे सर्व कर घ्यावे, अनधिकृत क्लासवर कारवाई करावी तसेच चितळे रोडवरील हॉटेलची पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे तरी लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी सुशांत जाधव यांनी केली.