महिनाभरात पोलिस प्रशासनाने गो हत्या व गो तस्करी करणारांवर धडाकेबाज कारवाई केली. या धडाकेबाज कारवाईमळे बजरंग दल व आमदर संग्राम जगताप यांनी पोलीस प्रशासनाचा सत्कार केला. दरम्यान, गो हत्या मुक्त जिल्हा करणार असल्याचा निर्धार आमदर संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात गो हत्या, गो तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते.पोलीस प्रशासनाकडून अनेक ठिकाणी कारवायाही करण्यात आल्या. परंतु गेल्या महिनाभरात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने गो हत्या व गो तस्करी करणारांवर धडाकेबाज कारवाई केली.
त्यांच्या या कामगिरी बाबत शहरातील हिंदुत्ववादी संघटना तसेच बजरंग दल व आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने पोलीस प्रशासनाचा सत्कार करण्यात आला. तसेच अहिल्यानगर शहरासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा गो हत्या मुक्त करणार असा निर्धार याप्रसंगी आमदार संग्राम जगताप यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
यावेळी बजरंग दलाचे गोरक्षणाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रमुख बजरंग दल हृषिकेश भागवत, यांच्यासह बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप यांनी व गोरक्षकांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांचा सन्मान केला.