पांजरापोळ गोरक्षण संस्थेत हुरडा पार्टीचा शुभारंभ , 4 दशकांची परंपरा
दूधमोगरा हुरड्यासह निसर्गाच्या सान्निध्यात महाराष्ट्रीयन, राजस्थानी जेवणाचीही लज्जत
नगर : गुलाबी थंडी आणि कोवळा लुसलुशीत हुरडा, निसर्गरम्य वातावरण यांचे अनोखं नातं आहे. नगर -दौंड रोडवरील पांजरपोळ गोरक्षण संस्थेने सुमारे 42 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात प्रथमच हस्तीमलजी मुनोत व स्व.शांतीलाल बोरा यांच्या संकल्पनेतून हुरडा उत्सव सुरू केला. शहरातील लोकांची आवड ओळखून दूरदृष्टीने सुरू केलेला हा उपक्रम आज राज्यात, देशात लोकप्रिय झाला आहे. यंदाही संस्थेत हुरडा पार्टी उत्सव सुरू झाला आहे. कणसासह ४५० रूपये किलो दराने हुरडा उपलब्ध आहे. याशिवाय चिल्ड्रन्स पार्क येथे उभारण्यात आले आहे. याठिकाणी ८२५ जनावरे असून ७० दुभती गायी आहेत. शुद्ध दुधासाठी नागरिकांनी आवर्जून संपर्क साधावा. घरपोच दूध सेवाही उपलब्ध आहे, अशी माहिती संस्थेचे ऑनररी सचिव किशोर मुनोत यांनी दिली.
हुरडा महोत्सव शुभारंभ संस्थेचे ऑनररी सचिव किशोर मुनोत व उपाध्यक्ष सतीश डुंगरवाल यांच्या हस्ते हुरड्याच्या भट्टीची विधीवत पूजा करून करण्यात आला. ऊसाच्या रसाच्या चरकाची पूजा उपाध्यक्ष शरद मुनोत यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत, उपाध्यक्ष सतीश डुंगरवाल व शरद मुनोत, सहसचिव मणिकांत भाटे व नरेंद्र लोहाडे, कार्यकारी मंडळ सभासद नंदलाल मणियार, संजय बोरा, श्यामसुंदर सारडा, प्रविण गांधी, प्रेमराज बोथरा, विक्रम फिरोदिया,
सी.ए., आयपी अजय मुथा, मनोज गुगळे, संजीव गांधी, विजय कोथिंबीरे, धिरज मुनोत, शिवकांत हेडा, ॲड. शरद पल्लोड, व्यवस्थापक महेश मुनोत, उप व्यवस्थापक राजकुमार पितळे आदी उपस्थित होते.
भारतीय संस्कृतीत सणवारांची कमतरता नाही. जवळपास प्रत्येक महिन्यात एक तरी सण असतो व तो प्रत्येक जण मोठ्या उत्साहात साजरा करतात. भारतात दिवाळी हा सण सर्वात माठा सण आहे. दिवाळीला सणाचा राजा म्हणतात. दिवाळी साधारणपणे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात असते. दिवाळीनंतर पुढील येणाऱ्या सणाला बराच वेळ असतो. परंतु सणाची ही जागा हुरडा महोत्सव भरून काढतात. दिवाळीमध्ये प्रत्येकाच्या घरात गोडधोड पदार्थ मोठ्या प्रमाणावर होतात. दिवाळी झाल्यानंतरही प्रत्येकाच्या घरात १५-२० दिवस दिवाळीची मिठाई, नमकीन पदार्थ असतात. एकदा का घरातील सर्व पदार्थ संपले की हुरड्याची आठवण येते. त्याच वेळेस साधारण नोव्हेंबर अखेर पासून जानेवारी अखेर पर्यंत पांजरपोळ संस्थेमध्ये हुरड्याची लगबग सुरू होते.
संस्थेचा दुध मोगरा हुरडा हा सर्वश्रुत असून लोकांच्या आवडीचा आहे. महाराष्ट्रात हुरडा पार्टींची सुरूवात संस्थेने प्रथम केली. त्यानंतर आज सर्वत्र मोठ्या प्रमाणावर हुरडा पार्टी सुरू झाल्या आहेत. त्या ठिकाणी वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम असतील, परंतु हुरड्याचा खरा आस्वाद घ्यायचा असेल तर त्यांना संस्थेमध्ये यावे लागते. संस्थेमध्ये हुरड्याबरोबर लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, रेवड्या, गोडीशेव यांची उपलब्धता असते. त्याचबरोबर दही, ऊसाचा रस व महाराष्ट्रीयन पध्दतीचे जेवण असते. संस्थेमध्ये येणाऱ्या छोट्या-मोठ्या ग्रुपच्या मागणीनुसार राजस्थानी दाळबाटी जेवण व इतरही मेनू दिले जातात.
संस्थेचा परिसर दाट झाडींना नटलेला शहरापासून अगदी जवळ व सुरक्षित असा असल्याने संस्थेमध्ये महिला वर्गाची उपस्थिती हुरड्यासाठी लक्षणीय असते. छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी व गेट टुगेदर साठी संस्थेचा प्रशस्त हॉल उपलब्ध आहे. तसेच लहान मुलांच्या दृष्टीने शहरातील गोंगाटापासून व वाहतूकीच्या वर्दळीपासून अत्यंत निवांत व सुरक्षित असा आहे. लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी उपलब्ध आहे.
इतरत्रही मोठ्या प्रमाणावर हुरडा मिळेल. परंतु संस्थेच्या हुरड्याची मजा, आपुलकीची चव काही औरच असते. नागरिक संस्थेच्या हुरड्याचे कौतुक करतात व इतरत्र जरी मोठ्या प्रमाणावर हुरडा उपलब्ध असला तरी संस्थेसारखा हुरडा कुठेही मिळत नाही असे आवर्जून सांगतात.
संस्थेतील हुरड्याची लज्जत तर अप्रतिम असतेच, परंतु संस्थेमध्ये हुरडा खाल्ल्याचे जे काही पैसे संस्थेमध्ये जातात तो पैसा संस्थेतील गोवंशाच्या पालनपोषणासाठीच वापरला जातो. भारतीय संस्कृतीत जीवदयेला खूप महत्त्व आहे. म्हणजेच आपण संस्थेमध्ये हुरडा पार्टीस येऊन संस्थेच्या जीवदयेच्या पुण्य कार्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी होण्याचा मान मिळतो. संस्थेतील लुसलुसीत, गोड, कोवळ्या हुरड्याचा आस्वाद घेऊन संस्थेच्या जीवदयेच्या कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. शेवटी नरेंद्र लोहाडे यांनी आभार मानले. बुकिंगसाठी संपर्क : (०२४१) २४७०९३२, २४७१७३२, राजकुमार पितळे (मो.९८२२२९४८३१), महेश मुनोत (मो.९४२०६३९२३०), शैलेश गुंदेचा (मो. ९२७०१२०३६९)