ऋषिकेश ढाकणे राष्ट्रीय पातळीवरील म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर म्हणून मान्यता
दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी देशातील नामांकित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेक्युरिटीज मार्केट या संस्थेच्या परीक्षेत नाशिक येथे झालेल्या परीक्षेत ऋषिकेश एकनाथ ढाकणे ८२ टक्के मार्काने उत्तीर्ण होऊन राष्ट्रीय म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर म्हणून क्वालिफाइड झालेला आहे.त्याबद्दल त्याचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केलेले आहे.ऋषिकेश ढाकणे हा नामांकित स्टार हेल्थ इन्शुरन्स म्हणजेच आरोग्य विमा मध्ये यशस्वी विमा सल्लागार म्हणून कार्यरत असून अनेक रुग्णांना वेळोवेळी स्टार हेल्थ इन्शुरन्स आरोग्यविण्याचा फायदा करून दिलेला आहे.त्याचबरोबर विमे दारांना उच्च दर्जाची सेवा पुरवलेली आहे.तसेच देशातील नामांकित भारतीय जीवन विमा निगम कंपनीचा विमा ॲडव्हायझर म्हणून जवळपास पंधरा वर्षापासून विमा क्षेत्रात कार्यरत आहे.शेकडो उमेदवार ग्राहक विमा संरक्षणाबरोबर गुंतवणुकीचा पर्याय टॅक्सेस साठी मार्गदर्शन यामध्ये उत्कृष्ट विमा सल्लागार म्हणून नावलौकिक मिळवलेला आहे.ऋषिकेश ढाकणे हा महाराष्ट्रातील ग्रामसेवकांचे नेते एकनाथ ढाकणे यांचे चिरंजीव असून ढाकणे शैक्षणिक संकुल चे विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत.त्याचबरोबर संगमनेर शहरांमध्ये ब्रॅण्डेड स्पाईकर शॉपी चे दालन यशस्वी उद्योजक म्हणून चालवत आहेत.अनेक सेवा एका एक छत्राखाली म्हणून ढाकणे परिवार कार्यरत आहे.या निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे समक्ष फोन द्वारे हार्दिक अभिनंदन केले आहे व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
ऋषिकेश ढाकणे राष्ट्रीय पातळीवरील म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर म्हणून मान्यता
- Advertisement -