शिवसेना ठाकरे गटातील ओमकार शेळके यांचा भाजपमध्ये प्रवेश
भाजपात चांगले काम करणार्यांना योग्य संधी मिळते
-ऍड अभय आगरकर
नगर -पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुखयमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वघटकांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा लाभ संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम भाजपाच्या कार्यकर्त्यांनी करावयाचे आहे. तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पदाधिकारी यांनी काम करावे. अहिल्यानगर शहरात भाजपाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असून, याच जोरावर पक्षाशी अनेक लोक जोडले जात आहे. पक्षात चांगले काम करणार्यांना योग्य संधी मिळत असते. त्यामुळे अनेक जण भाजप पक्षात मोठ्या प्रमाणावर प्रवेश करत आहेत.सध्या भाजपची सदस्य नोंदणी सुरु असून अनेक जण सदस्य होत असल्याचे त्यांनी सांगितले . . भाजप पक्षाला जनसामान्यांपर्यंत नेण्याचे काम करावे, असे प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ऍड अभय आगरकर यांनी केले.
शिवसेना ठाकरे गटातील विद्यार्थी संघटक ओंमकार शेळके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी त्यांचे स्वागत शहर जिल्हाध्यक्ष ऍड अभय आगरकर यांनी केले . यावेळी सचिन पारखी ,बाबा सानप ,मयूर बोचूघोळ ,आकाश सोनवणे ,ओंकार लेंडकर ,केलास गर्जे ,सुमित इपलपेली ,रुद्रेश अंबाडे,शिव पंडित ,पवन भागवत ,अमोल निस्ताने ,विश्वजित माने ,रोहन शेवाळे ,हर्ष गायकवाड़ ,किशोर काळे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना ओंमकार शेळके म्हणाले कि भारतीय जनता पक्षाचे कार्य दिवसेंदिवस वाढत आहेत.त्यामुळे आपल्या हक्काच्या पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे . पक्षाची ध्येयधोरणे आपण निश्चितपणे सर्व सामान्य पर्यंत पोहचू असे म्हणाले .
यावेळी सचिन पारखी ,ओंकार लेंडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .






