नगर (प्रतिनिधी) – पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या २७ व्या ओकिनावा नॅशनल कराटे चॅम्पियनशिप मध्ये संगमनेर येथील कुमारी अद्विता आनंद हासे हिने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या स्पर्धेतील काता प्रकारामध्ये तिला रौप्य पदक तर स्पायरींग या क्रिडा प्रकारामध्ये कांस्यपदक मिळाले आहे.
पुणे येथे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज स्पोर्टस् कॉम्प्लेक्स बालेवाडी या ठिकाणी २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
संगमनेर येथील कराटे अकॅडमीचे संचालक दत्ता भांदुर्गे सर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शंभरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. द्वितीय क्रमांकाचे सर्वाधिक पदकं मिळवून या स्पर्धेत टीम संगमनेरने राष्ट्रीय उपविजेतेपद मिळविले.
कुमारी अद्विता दैनिक युवावार्ताचे संस्थापक किसन भाऊ हासे यांची नात असून तिच्या या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे. दैनिक युवावार्ता परिवार व युवा पॉलीप्रिंट अँड पॅकेजिंग इंडस्ट्रीजचे वतीने कुमारी अद्विताचे अभिनंदन.
ओकिनावा नॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत कुमारी अद्विता आनंद हासे हिचे दैदिप्यमान यश
- Advertisement -