स्व. कृष्णाभाऊ जाधव यांच्या स्मरणार्थ साई क्रिकेट क्लब आयोजित प्रीमियर लीग स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
खेळामध्ये करिअरच्या संधी उपलब्ध – आ.संग्राम जगताप
अहिल्यानगर : न्यू आर्ट्स कॉलेजच्या मैदानावर स्वर्गीय कृष्णाभाऊ जाधव यांच्या स्मरणार्थ साई क्रिकेट क्लब आयोजित प्रीमियर लीग स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेचा अंतिम सामना साई द्वारका क्रिकेट क्लब विरुद्ध रायझिंग स्टार संघामध्ये अटीतटीचा झाला या स्पर्धेमध्ये साई द्वारका क्रिकेट क्लब ने 10 षटकामध्ये 117 धावांचे आव्हान रायझिंग स्टार संघाला 111 धावापर्यंतच मजल मारली आणि साई द्वारका क्रिकेट क्लब ने विजेतेपद पटकावले असून मॅन ऑफ द मॅच अविनाश दातरंगे, मॅन ऑफ द सिरीज हर्षल डोमकावळे, बेस्ट फिल्डर आकाश पिस्का, बेस्ट बॉलर संतोष बनधरे, बेस्ट बॅट्समन विकास गोरे यांना सन्मानित करण्यात आले. ही स्पर्धा 20 दिवस सुरू होती या स्पर्धेमध्ये १० टीम सहभागी झाल्या होत्या आणि साखळी पद्धतीने खेळविण्यात आली असून या स्पर्धेमध्ये सुमारे 160 खेळाडू सहभागी झाले असल्याची माहिती साई द्वारका सेवा ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.धनंजय जाधव यांनी दिली
स्वर्गीय कृष्णा भाऊ जाधव यांच्या स्मरणार्थ साई क्रिकेट क्लब आयोजित प्रीमियर लीग स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर ॲड.विश्वासराव आठरे पाटील, साई द्वारकासेवा ट्रस्टचे अध्यक्ष एडवोकेट धनंजय जाधव, माजी नगरसेवक निखिल वारे, राजेंद्र बलदोटा, राजू मामा जाधव, चैतन्य जाधव, दत्ता गाडळकर, पंडित वाघमारे, राजेंद्र बोगा, जितेंद्र लांडगे,आनंद पुंड, राजेंद्र गुगळे, रिकी बक्षी, प्रताप काळे, मितेश शहा, सागर फुलसौदर, छगन मोहिते,राहुल मुथा, सोमनाथ जाधव, आयोजक साई क्रिकेट क्लबचे गणेश गायकवाड, सनी दातरंगे, पंकज सावंत, राज कोंडके, गणेश भिसे, सर्वेश देशमुख, सौरभ येणारे, गौतम गायकवाड आदी उपस्थित होते
स्वर्गीय कृष्णाभाऊ जाधव यांनी नेहमीच शहरातील जनतेचे प्रश्न मांडण्याचे काम केले त्यांच्या नावाने गेल्या 4 वर्षापासून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करीत खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले गेले असल्यामुळे खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले क्रिकेट खेळामध्ये दिवसेंदिवस बदल होत चालले असून 50 षटकाचा सामना आता 20 षटकापर्यंत आला आहे त्यामुळे पारितोषिक देखील वाढले आहे आता खेळाडूंना देखील क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या असल्याचे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले
कोणतेही अपयश कायम नसते त्यासाठी जिद्द, चिकाटी मेहनतीची खरी गरज असून प्रयत्नांवर विश्वास ठेवला पाहिजे स्वर्गीय कृष्णा भाऊ हे संघर्षशील नेतृत्व होते त्यांनी निमित्त सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठविला होता खेळाला आता चांगले दिवस आले असून सरकार देखील खेळाडूंचे कौतुक करत मोठ्या प्रमाणात मानधन देत आहे त्याबरोबर खेळाडूला शासकीय नोकरीमध्ये देखील सामावून घेतले जात असल्याची माहिती ॲड. अभय आगरकर यांनी दिली
जगामध्ये खेळाला खूप महत्त्व आले आहे आपली खो-खो ची टीम जागतिक स्तरावर जाऊन आपल्या देशाचे नावलौकिक केले त्यामुळे आपले भारतीय खेळ जगाच्या पाठीवर गेले आहे आपल्या जीवनामध्ये खेळ हा महत्त्वाचा घटक झाला आहे पालकांनी देखील आपल्या पाल्याला खेळाचे महत्व पटवून दिले पाहिजे त्याच्या आवडीच्या खेळासाठी प्रोत्साहित केले पाहिजे नगर शहराला खेळ संस्कृती लाभली आहे आणि ती वाढवण्यासाठी काम केले पाहिजे असे मत ॲड. विश्वासराव आठरे पाटील यांनी केले






